शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्रकरणांत चौघांना सश्रम कारावास

By admin | Updated: September 24, 2014 23:39 IST

मारहाणीच्या घटनांतील दोन प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ यातील दोन आरोपींना सहा महिने तर दोघांना एक वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा

समुद्रपूर : मारहाणीच्या घटनांतील दोन प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ यातील दोन आरोपींना सहा महिने तर दोघांना एक वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ दोन्ही प्रकरणात न्या़ आसुदानी यांनी निर्वाळा दिला़समुद्रपूर पोलीस ठाण्यासच्या हद्दीतील मौजा करडा (जुना) येथील रत्नमाला अनिल चहांदे व तिचा पती अनिल रामदास चहांदे यांना ३० जानेवारी २००८ रोजी लालेश्वर वानखेडे व भाऊराव वानखेडे यांनी उसणे गहू का मागितले, या कारणावरून काठी व कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केली़ याबाबतच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ संपूर्ण तपासानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले़ यात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समुद्रपूर येथील न्यायालय क्रमांक ३ चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वि.र. आसुदानी यांनी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३२४ अधिक ३४ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी ७ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुणावली़ दुसऱ्या प्रकरणात डोंगरगाव येथील प्रदीप चंदनखेडे यांना २५ डिसेंबर २००७ रोजी दिवाकर व दिलीप चंदनखेडे यांनी माझ्या पोरीच्या लटा का धरल्या, यावरून लाठ्याकाठ्यांनी गंभीर मारहाण केली़ तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले़ यात न्यायालय क्रमांक ३ चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वि.र. आसुदानी, यांनी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३२३ अधिक ३४ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावला. दोन्ही प्रकरणांत सरकारी वकील अ‍ॅड़ संदीप देवगिरकर यांनी युक्तीवाद केला़ त्यांना ठाणेदार जिट्टावार व झोटींग यांनी सहकार्य केले़ डोंगरगाव येथील प्रकरणाचा तपास सुधाकर पचारे यांनी तर करडा येथील प्रकरणाचा तपास जागेश्वर मिश्रा यांनी केला़(तालुका प्रतिनिधी)