शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला मारहाण करून १० लाखांच्या लिफ्टसह ट्रक लंपास

By admin | Updated: February 7, 2015 01:24 IST

चालकाला भ्रमणध्वनीवरून लिफ्ट नागपूर येथे न उतरविता जाम येथे उतरवायची आहे़, असे सांगून ट्रकला थांबवून चालकाला मारहाण करीत ...

समुद्रपूर :चालकाला भ्रमणध्वनीवरून लिफ्ट नागपूर येथे न उतरविता जाम येथे उतरवायची आहे़, असे सांगून ट्रकला थांबवून चालकाला मारहाण करीत लिफ्टसह ट्रक लांबविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघड झाली. यात चोरट्यांनी एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण रामदास गाते (४५) रा़ विहिरगाव जि़ गोंदिया हा चेन्नई येथील डागा गॅरेजमधून ट्रक क्ऱ एम़एच़३२/७९६ ने १० लाख रुपये किंमतीच्या दोन लिफ्ट घेवून नागपूरसाठी निघाला होता़ २ फे्रबु्रवारीच्या रात्री ८़३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील जाम चौरस्ता पास करून महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगावजवळ ट्रक पोहचला असता अतुल नामक व्यक्तीने फोन केला व तुझ्या ट्रक मधील लिफ्ट नागपूरला नाही जामलाच उतरवायची आहे़, तेव्हा तु ट्रक थांबव असे सांगितले. यावरून ट्रक चालकाने ट्रक थांबविला असता मागाहून दुचाकीवर अतुल नामक व्यक्ती व एका आनोळखी व्यक्तीने ट्रक चालाकाला दुचाकीवर बसवून कुठे लिफ्ट उतरवायची आहे ती जागा दाखवितो असे म्हणून नेले. दूरवर कालव्याच्या रस्त्याने नेवून त्याला दुचाकीवरून ढकलून मारहाण करून त्याला तिथेच सोडून देण्यात आले. या दोघांनी लिफ्टसह ट्रक लंपास केला. यात एकूण १६ लाखांचा माल लंपास केला़ या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी सदर ट्रकचालकाने समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केला असून प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल जिट्टावार करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)