शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधक न दिसल्याने ट्रॅव्हल्स उलटली

By admin | Updated: June 1, 2016 02:35 IST

नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली.

वाहक ठार : ५० प्रवासी जखमी
सेलू : नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली. यात ट्रॅव्हल्सखाली दबून वाहक ठार झाल्याची माहिती आहे. तर सुमारे ५० ते ६० प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी ट्रॅव्हल्सला सरळ करून जखमींना रुग्णालयात हलविले. हा अपघात सोमवारी रात्री धडला. ठार झालेल्या वाहकाचे नाव अ‍ैनूर पठाण रा. धपकी असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.३२ क्यू २४० ही ट्रॅव्हल्स नागपूर येथून प्रवासी घेऊन वर्ध्याकडे येण्यास निघाली. सुमारे ९ वाजताच्या सुमारास केळझर येथे पोहोचली. दरम्यान, केळझरनजीकच्या टोलनाक्याजवळील गतिरोधक ट्रॅव्हल्स चालकाला दिसले नसल्याने गतिरोधकाहून ट्रॅव्हल्स उसळली आणि रस्त्यावरच उलटली. ट्रॅव्हल्समधील वाहक दरवाजावर उभा होता. त्याचा दबून मृत्यू झाला. सर्वच आरडा ओरडा सुरू झाली. वाचवा वाचवा म्हणून हंबरडे फोडू लागले. अचानक ट्रॅव्हल्स उलटल्याने प्रवासी दबले गेले. यामध्ये ट्रॅव्हल्सचा वाहक अ‍ैनूर पठाण याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघातस्थळी क्रेनला पाचावरण करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने उलटलेल्या ट्रॅव्हल्सला सरळ करून जखमींना रुग्णालयात पाठविले.
अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अपघातस्थळी केळझरचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव नरड, बबन वरडकर, गणेश तडस, डॉ. इरशाद शेख, इमरान शेख, ईशाद शेख, अ‍ैफाद शेख यांनी जखमींना बाहरे काढण्यात मदत केली.(तालुका प्रतिनिधी)