शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

भालदेव सणाची परंपरा सालदऱ्यात अजूनही कायम

By admin | Updated: September 30, 2014 23:39 IST

महाभारतकालीन भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताशी निगडीत असलेल्या गवळ्यांच्या भालदेव या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे़ असे असले तरी सालदरा या गावात मात्र हा सण

फनिंद्र रघाटाटे - रोहणा (वर्धा)महाभारतकालीन भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताशी निगडीत असलेल्या गवळ्यांच्या भालदेव या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे़ असे असले तरी सालदरा या गावात मात्र हा सण आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो़ पुरातन आख्यायिकेप्रमाणे गवळी बांधव पंचमहाभूताची पूजा म्हणून इंद्राची पूजा करीत होते; पण भगवान श्रीकृष्णाने ही पूजा बंद करण्यास सांगितले़ यामुळे इंद्राचा कोप होऊन मुसळधार पाऊस पडला. जनावरे पुरात वाहून जात असताना गवळ्यांनी श्रीकृष्णाचा धावा केला. तेव्हा त्यांच्या ंरक्षणार्थ श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला; पण कृष्णाच्या कर्मवादी विचारसरणीप्रमाणे पर्वताला लव्ह्यांचा आधार दिला़ त्यानेच तुमचे रक्षण केले म्हणून तुम्ही ‘लव्ह्याचा भालदेव’ म्हणून पूजन करावे, असा उपदेश केल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून गवळी समाज चार दिवस हा सण साजरा करतात. पूढे या समाजाने महानुभाव पंथ स्वीकारल्याने अनेक ठिकाणी ‘भालदेव’ उत्सव साजरा करणे बंद झाले. जिल्ह्यात सालधरा या गावात आजही हा सण उत्साहात साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी पालखी, बॅँडसह संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते़ विसर्जनही मोठ्या उत्साहात होते. महागाई, टंचाई, धार्मिक भावनांचा लोप यासारख्या कारणांनी याच जिल्ह्यातील विविध गावांत हा उत्सव बंद होण्याच्या मार्गावर असताना सालधरा हे गाव मात्र अपवाद ठरत आहे़ या गावातही महानुभावपंथी आहेत; पण ते त्यांच्या वंशपरंपरेला आजही चिकटून या उत्सवात सहभागी होतात. सालदरा या गावातील भालदेव सण कायम असल्याने अन्य गवळी समाजाचेही हा सण आकर्षणच ठरत आहे.