शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर उभारणीला आता अडथळा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींना सूचना : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोबाईल टॉवर बांधकाम परवानगी देण्या संबंतधात उप विभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवर बांधकाम परवानगी दिल्यानंतर मोबाईल कंपनी बांधकामाला सुरुवात करु शकतात. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतीने मोबाईल कंपनीच्या टॉवर बांधकामाला अडथळा आणू नयेत, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे. त्यामध्ये शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत अंतर्गत आलोडी येथील सर्वे क्रमांक ४५/१ मधील प्लॉट क्रमांक ३२, ३३, ३४, ३५ वर एजी २ आॅफीसचे बांधकाम असून या बांधकामामध्ये स्थानिक रहिवासी अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे.तसेच काही ग्रामपंचायतींकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही टाळाटाळ होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांची बैठक बोलावून मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी टॉवरच्या बांधकाम कोणताही अडथळा न अणता आपणास काही अडचणी असेल तर त्याची संविधानीक मार्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.टॉवरमुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा नागरिकांचा गैरसमज आहे. याबाबत भारत सरकारने दिलेल्या पत्रानुसार जागतिक आरोग्य संघटनांच्या विविध सर्वेक्षणावरुन निघालेल्या निष्कर्षानुसार माबाईल टॉवर व लहरीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.ही बाब स्थानिकांच्या लक्षात आणून देत टॉवर उभारणीच्या कामातील अडथळा दूर करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल