शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्याचा आरोप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहारचा ठिय्या : मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहे. इतकेच नव्हे तर हवालदील झालेल्या शेतकºयांच्या कृषीपंपाला रात्रीच्या सुमारास विद्यृत दिल्या जात आहे. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसाला विद्युत पुरवठा देण्यात यावा या मुख्य मागणीसाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्याचा आरोप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला. पूर्वीच परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. तर दुसरे आंदोलन महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसाला विद्युत पुरवठा करण्यात यावा. शिवाय रसुलाबाद परिसरातील तक्रारी निकाली काढण्यात याव्या आदी मागण्या या आंदोलनादरम्यान रेटण्यात आल्या. याप्रसंगी अधीक्षक अभियंता वानखेडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे देवळी विधानसभा प्रमुख तथा रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बैठक बोलावली होती. याच बैठकीदरम्यान कार्यालयातच ठिय्या देण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती