वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:30 IST2019-07-15T22:29:52+5:302019-07-15T22:30:29+5:30

नजीकच्या धामणगाव (गाठे) व दसोडा गावातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. वाघाने पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

Tiger killed five people including a goat | वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार

वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार

ठळक मुद्देपरिसरात दहशत : पशुपालकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरा : नजीकच्या धामणगाव (गाठे) व दसोडा गावातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. वाघाने पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
वाघाने गोठ्यात प्रवेश करून पाच शेळ्या आणि गोºह्याला ठार करून पुन्हा आपली परिसरात दहशत निर्माण केली आहे. या घटनेमुळे पशुपालकांसह शेळीपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाने धामणगाव (गाठे) येथील वसंता आडे यांच्या मालकीच्या पाच शेळ्या ठार केल्या. तर दसोडा येथील सोमाजी उईके याच्या मालकीचे गोऱ्हा गतप्राण केले.
या दोन्ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. नुकसाग्रस्तांना वनविभागाने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: Tiger killed five people including a goat