शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोविड निर्मुलनासाठी ‘थ्री-टी’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणीवर भर : आरोग्य विभागाने कसली कंबर, मृत्यू टाळण्यासाठी होताय प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसुत्री संकल्पनेवर भर देऊन जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत. कोरोना काळातील पुढील धोका लक्षात घेऊन शोध, निदान आणि उपचार याला प्राधान्यक्रम दिल्या जात असल्याने लवकरच वर्धा जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुळे पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर एकाचा इतर आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत असल्याचे वास्तव आहे. कोविड बाधित वेळीच बरे होण्यासाठी थ्री टी ही संकल्पना सध्या उपयुक्त ठरत आहे.१६० व्यक्तींची कोरोनावर मातजिल्ह्यातील २१९ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी जिल्ह्याबाहेरील तसेच वर्धा जिल्ह्यातील १६० कोविड बाधितांना वेळीच आणि योग्य उपचार मिळाल्याने त्यांनी कोरोनावर मात केल्याचे वास्तव आहे. तर सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तींने कोरोनावर विजय मिळविल्यानंतर त्याचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.रविवारी सात रुग्ण रविवारी आढळले सात नवीन रुग्णवर्धा : रविवारी २१२ व्यक्तींच्या कोविड चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सात व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये दोन देवळी तालुक्यातील तर पाच वर्धा तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.थ्री टी संकल्पनेला शंभर पैकी शंभरच गुण देऊथ्री ‘टी’ संकल्पना खरोखर उपयुक्त आहे काय याबाबत अधिक माहिती कोरोनामुक्त झालेल्या आर्वीतील एका व्यक्तीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जाणून घेतली असता, ट्रेस (शोध), टेस्ट (निदान) आणि ट्रीट (उपचार) ही संकल्पना खरोखर उपयुक्त आहे. या संकल्पनेला आपण शंभरपैकी शंभर गुण देतो. शिवाय मला आरोग्य सेवाही चांगली मिळाल्याने मी कोरोनावर मात करू शकलो. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मी गृहविलगीकरणात असून लवकरच यातून माझी मुक्तता होणार असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले.विलगीकरणाचे नियम ठरते उपयुक्तकोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला १४ विलगीकरणात ठेवले जात आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून वर्धा जिल्ह्यात परतणाऱ्यांना सुरूवातीला सात दिवस संस्थात्मक तसेच नंतरचे सात दिवस गृहविलगीकरणात ठेवले जात असल्याने कोविडचा स्प्रेड टाळण्यासाठी मदत होत आहे. एकूणच जिल्हा प्रशासनाने आखून दिलेले विलगीकरणाचे नियम सध्या उपयुक्तच ठरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या