शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजक सौंदर्यीकरण ‘रोल मॉडेल’चे तीनतेरा

By admin | Updated: July 7, 2014 00:04 IST

शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची योजना आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ तयार करण्यात आले. हेच रोल मॉडेल नंतर

पराग मगर - वर्धाशहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची योजना आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ तयार करण्यात आले. हेच रोल मॉडेल नंतर शहरातील सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने इतर चौकात करण्यात येणार होते. त्यानुसार सोशालिस्ट चौकात दुभाजकावर सौंदर्यीकरण करून झाडे लावण्यात आली; पण नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने दुभाजक सौंदर्यीकरणाच्या रोल मॉडेलचे तीनतेरा झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर छोटे छोटे चौक असून दोन्ही बाजूला असलेल्या मार्केटमध्ये जाणे सोयिस्कर होते. मुख्य मार्ग असल्याने तो आकर्षक आणि हिरवळीचा असावा अशी शहरवासीयाची स्वाभाविक इच्छा होती. त्यासाठी म्हणून काही वर्षांपूर्वी काही दुभाजकांवर लोखंडी कठडे बसवून झाडे लावण्यात आली. पण यातील झाडांकडे लक्ष न दिल्याने आणि ही झाडे मोठी वाढणारी असल्याने या दुभाजकांवर रान तयार झाले. तसेच कठडेही अपघातांमुळे तुटून बाहेरच्या बाजूला वाकले. त्यामुळे अपघातही वाढले. मोठ्या झाडांच्या सावलीत मोकाट जनावरे बसण्याचा प्रकार सुरू झाला. या सर्व बाबींना आळा बसावा यासाठी म्हणून नगरपालिकेच्या वतीने दुभाजक सौंदर्यीकारणाचे एक नवे रोल मॉडेल तयार करण्यात आले. याचा डेमो सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आला. दुभाजकावर त्रिकोणी आकाराचे टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच त्यावर छोटे बॅनर लावण्याची सोय करण्यात आली. नगर परिषदेच्या योजना तिथे बॅनरच्या साहाय्याने लावण्यात आल्या. पुढे जाऊन असेच सौंदर्यीकरण सामाजिक संस्था आणि इतर व्यावसायिकांच्या मदतीने करण्याचा मानस होता. त्या ठिकाणी आपल्या जाहिराती लावण्याची मुभा देण्यात येणार होती. पण त्याचा अद्याप अत्तापत्ता नसतानाच या सौंदर्यीकरणाचेही तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. झाडे लावण्यात आलेल्या टाक्यांमध्ये कचरा साचला आहे. या झाडांना नियमित पाणी दिले जात असल्याचे दिसत असले तरी त्याची नीट स्वच्छता होत नसल्याचे दिसते. परिसरातील कागदाचा कचरा, प्लास्टिक पाणी पाऊच, कागद, खर्रा पन्नी, गुटखा पुड्या अशा प्रकारचा कचरा या कुंड्यांमध्ये आढळून येत आहे. तसेच मोकाट चरत असलेल्या बकऱ्या यातील झाडांना खाऊन टाकतात. त्यामुळे एक चांगली योजना केवळ रोल मॉडेलपुरतीच राहते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पालिकेने या सौंदर्यीकरणाची सफाई करून नियमित काळजी घ्यावी अशी तसेच नागरिकांनीही कचरा टाकणे बंद करावे अशी मागणी केली जात आहे.