शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात तीन ठार, चार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

पहिला अपघात सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयाजवळ  झाला. यामध्ये नगरपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी राजू कृष्णाजी सुरकार (४५) हे जागीच ठार झाले. मृत सुरकार हे ढाब्यावर जेवण करुन देवळीकडे पायदळ जात येत होते. यादरम्यान मागाहून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जबर धडक  दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

ठळक मुद्देमृतामध्ये न.प.च्या कर्मचाऱ्याचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : परिसरात पंधरा तासांच्या अंतराने वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात तिघांना जीव गमवावा लागला. तर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. एका पोठोपाठ झालेल्या या अपघातांमुळे परिसरात काळजी व्यक्त होत आहे.पहिला अपघात सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयाजवळ  झाला. यामध्ये नगरपालिकेचे पाणीपुरवठा कर्मचारी राजू कृष्णाजी सुरकार (४५) हे जागीच ठार झाले. मृत सुरकार हे ढाब्यावर जेवण करुन देवळीकडे पायदळ जात येत होते. यादरम्यान मागाहून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जबर धडक  दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. दुसरा अपघात देवळी ते रत्नापूर मार्गावर राणोजी महाराज यांच्या मठाजवळ सोमवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान झाला. यात यवतमाळकडून देवळीळीच्या दिशेने येणाऱ्या एम.एच. ३१ डिके ००८९ या क्रमांकाच्या भरधाव कारने सामोरील एम.एच. ३२ एके ०१५९ क्रमाकाच्या मालवाहू गाडीला जबर धडक दिली. या अपघातात कार चालक राजू मनोहर लढी (४०) रा. सालोड जागीच ठार झाला. तसेच मालवाहू गाडी चालक सचीन वासुदेव परतपुरे (२५) रा. वाबगाव हा जखमी झाला. तर तिसरा अपघात मंगळवारी दुपारी सव्वा वाजतादरम्यान वाटखेडा चौफुलीवर कार व दुचाकीमध्ये झाला. एम.एच. ४० बी.ई. ३०१४ क्रमांकाची कार अडेगाव मार्गे देवळीकडे येत होती तर याच दरम्यान अंदोरीकडून दुचाकी येत होती. या दोन्ही वाहनांची वाटखेडा चौफुलीवर धडक झाली. यात दुचाकीवरील अशोक विठोबाजी राऊत (४८) रा. वणोजा ता. राळेगाव हे जागीच ठार झाले तर दुचाकी चालक देवराव तायवाडे रा. वणोजा हे जखमी झाले. देवळी पोलिसांनी तिन्ही घटनेची नोंद घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात