एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:12+5:30

महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) आणि वर्धा येथील समतानगर येथील रहिवासी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.

Three corona positive patients on the same day | एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next
ठळक मुद्देरुग्ण संख्या २३ वर। सावंगी (मेघे), आंजी (मो.), पिपरी (मेघे)चा बहुतांश भाग सील

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात वीज दुरूस्तीच्या कामासाठी गेलेल्या २० पैकी ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रा.पं.च्या हद्दीतील समतानगर, आंजी (मोठी) व पिपरी (मेघे) येथील काही भाग सील करण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकाच दिवशी तीन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २३ झाली आहे.
महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची संसर्ग झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. या तिन्ही कोरोनाबाधितांवर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महावितरणचे कर्मचारी बुधवारी परतल्यावर त्यातील सात कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर चौघांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी, आंजी (मोठी), पिपरी (मेघे) आणि वर्धा येथील समतानगर येथील रहिवासी आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.

तीन वाहनांनी परतले २० व्यक्ती
तीन वाहनांनी हे २० कर्मचारी कोकणातून वर्धा जिल्ह्यात परतले. सात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून उर्वरित १३ कर्मचाऱ्यांचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ज्या वाहनाने हे कर्मचारी वर्ध्यात आले त्या वाहनाच्या तिन्ही चालकांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. शिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कात कुणी व्यक्ती आलेत काय याचा शोध सध्या महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी घेत आहेत.

आंजीत दोन दिवस बाजारपेठ बंद
आंजी येथील वॉर्ड क्र. १ मधील रहिवासी आणि खरांगणाच्या महावितरणच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याने आंजी येथे खळबळ उडाली आहे. सदर वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच लागण झालेल्या इसमाच्या पत्नी व मुलीला तपासणीसाठी सावंगी येथे नेण्यात आले. शिवाय त्यांचे स्वॅब घेण्यात आले. सकाळी वर्धेच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, गटविकास अधिकारी स्वाती इसाये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी बोरकर, बांधकाम विभागाचे अभियंता संजय मंत्री, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सरपंच जगदीश संचेरिया, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा काळे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर आसुटकर, उपसरपंच दिलीप रघाटाटे, तलाठी खामलकर, सुनील गफाट यांनी आंजी (मोठी) गाठून पाहणी केली.

Web Title: Three corona positive patients on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.