शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन चिमुकल्यांचे पुन्हा शवविच्छेदन

By admin | Updated: May 9, 2015 01:57 IST

पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता.

कारंजा (घाडगे) : पाण्यात बुडून नाही तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप धावसा येथील मोरश्वर वझरकर व शेलेश करणाके या मृतक मुलांच्या पालकांनी केला होता. त्यांच्या आरोपानुसार या मृतकांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. यावरुन शुक्रवारी या दोघांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याने दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ही बाब आता रहस्यमय बनली आहे. तालुक्यातील धावसा (हेटी) येथील मोरेश्वर वझरकर (१२ ) व शैलेश करणाके (१४) या दोघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे समोर आले. यावेळी डॉक्टरांनीही त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अहवाल दिला होता. मात्र त्यांच्या पालकांनी केलेल्या आरोपामुळे उपविभागीय अधिकारी एम.आर.चव्हाण यांनी या दोघांचे मोक्यावर जात पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ़ पवन वानखेडे, डॉ़ संजय गाठे, डॉ़ बिसेन, डॉ शीतल सोलंकी यांनी शवविच्छेदन केले. यावेळी नायब तहसीलदार गणेश बर्वे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.तपासणीकरिता आलेल्या चमूने या दोघांच्या मृतदेहाचे व्हिसेरा घेत त्याची प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा अहवाल येण्यास काही दिवसाचा काळा लागणार असल्याने या दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट सांगता येत नसल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अहवालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)