शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सागवान चोरी व शिकारीला ऊत

By admin | Updated: September 9, 2014 00:34 IST

कोट्यवधी रुपयांची वनसंपदा, वन्यप्राण्यांचा जीव सध्या दैवाच्या हवाली झाला आहे. वनाची रखवाली करणारे संपावर गेल्याने वनसंपदेचे संरक्षण करायला कुणी वालीच राहिला नसल्याचे दिसते.

आकोली : कोट्यवधी रुपयांची वनसंपदा, वन्यप्राण्यांचा जीव सध्या दैवाच्या हवाली झाला आहे. वनाची रखवाली करणारे संपावर गेल्याने वनसंपदेचे संरक्षण करायला कुणी वालीच राहिला नसल्याचे दिसते. परिणामी, बेसुमार जंगल तोडीसह शिकारीला ऊत आल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. हिंगणी व खरांगणा ही लगतची दोन वनपरिक्षेत्र सागवृक्षांसाठी प्रसिद्ध आहे. मौल्यवान साग वृक्षांसह बहुमूल्य वनौषधीचा ठेवा जंगलात आहे. पशु-पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या या वनपरिक्षेत्रात जंगलराज सुरू आहे. दिवसाढवळ्या सागवृक्षांची कत्तल होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. आमगाव, रायपूर, रिधोरा, माळेगाव, बोरखेडी व आकोली परिसरात शिकारीला उधाण आल्याची स्थिती आहे. दररोज शिकारीच्या घटना घडताना दिसत आहेत. हरीण, मोर, ससा यांच्या जीवाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. उपवनसंरक्षक चव्हाण यांच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगलात चोरीच्या घटना घडत नव्हत्या; पण सध्याचे चित्र पाहू जाता जंगलावर राज्य कुणाचे, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. काही वनमजूर आपली सेवा बजावत असले तरी काही मात्र जंगलाचे रक्षणकर्ते आहे की, चोरट्यांचे हे समजणे कठीण झाले आहे. एका वनमजुराची चोरटे व शिकारदाराशी सलगी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सर्वत्र चर्चाही सुरू आहे; पण वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही शासनाने मान्य केलेल्या नाहीत. यामुळे संप सुरू असल्याने जंगलांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने सर्वत्र आलबेल आहे.(वार्ताहर)