शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगा कुठे आहे शहरात दारुबंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये पूर्णत: दारुबंदी करण्यात आली. दररोज किरकोळ कारणावरुन वाद, हाणामारी त्यातूनच मोठ्या घटना झाल्याचे वर्धेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात उघड्यावरच बेकायदीशररीत्या दारुविक्री आणि तेथेच खुशाल दारु ढोसण्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. वाढत्या गुन्हेगारीत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्देकुठे बसा अन् खुशाल ढोसा : ठिकठिकाणी दारूची चोरटी विक्री, काहींकडून दारुची होम डिलिव्हरी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उघड्यावरच दारुविक्री अन् त्याच ठिकाणी खुशाल ढोसणाऱ्या तळीरामांचा गोतावळा शहरातील विविध चौकांमध्ये सुरु आहे. दारूबंदी जिल्ह्यात बिनधास्तपणे दारुची विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आला आहे. उघडपणे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले तरी त्याकडे पोलिसांचे मात्र, दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये पूर्णत: दारुबंदी करण्यात आली. दररोज किरकोळ कारणावरुन वाद, हाणामारी त्यातूनच मोठ्या घटना झाल्याचे वर्धेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात उघड्यावरच बेकायदीशररीत्या दारुविक्री आणि तेथेच खुशाल दारु ढोसण्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. वाढत्या गुन्हेगारीत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, या प्रकारामुळे शहरात मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अवैध दारुविक्री तसेच अवैध दारु व्यावसायिकांवर आळा बसावा यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असले तरी जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारुविक्री फोफावत असल्याचे चित्र आहे.दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना दारुबंदी जिल्ह्यात सुरु असलेली दारुविक्री उठविण्यात पोलीस विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरात दारुचे पाट वाहत आहेत. पोलीस कारवाई करतात असेही सांगितले जाते, मग जिल्ह्यात दारुचा हा माहापूर कसा? असा सवाल विचारण्यात येत आहे.असे केले ‘स्टिंग ऑपरेशन’मागील दोन दिवसांपासून लोकमत चमूने दुपारी व सायंकाळी शहरातील काही चौकांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने पानटपऱ्यांवर, हॉटेलमध्ये तसेच आम्लेट पावच्या गाड्यांवर तळीरामांचा गोतावळा दिसून आला. काही ठिकाणी दारु उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार बॅचलर रोड, आर्वी नाका, झोपडपट्टी, तुकाराम वॉर्ड, सिंदी (मेघे), शास्त्री चौक, इतवारा परिसर, महादेवपुरा,हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, धंतोली चौक, इंदिरा मार्केट परिसर, स्टेशनफैल, पुलफैल, इंदिरानगर परिसर येथे खुलेआम दारुविक्री सुरु असल्याचे दिसून आले.‘अन्’ हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणेखुलेआम सुरु असलेली दारुविक्री आणि तळीरामांची होणारी गर्दी , ही स्थिती ज्या चौकांमध्ये आहे.त्या ठिकाणांपासून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहेत. शिवाय पोलीस अधीक्षक कार्यालया नजीकच हा प्रकार घडत आहे. असे असले तरी, याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.काय म्हणतो कायदा?मुंबई दारुबंदी अ‍ॅक्टनुसार, सार्वजनिक ठिकाणी दारुविक्री आणि दारु पिण्यास बंदी आहे. असे करणाºयांना तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :liquor banदारूबंदी