शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

टी.बी. एमडीआरचे आता वर्धेत दोन तासांत निदान

By admin | Updated: May 1, 2016 02:06 IST

क्षयरोग, उपचार असला तरी जीवघेणा ठरणारा आजार. या आजाराची पहिल्या टप्प्याची चाचणी जिल्हास्तरावर होते;

रुग्णांना दिलासा : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या क्षयरोग विभागात अत्याधुनिक मशीनवर्धा : क्षयरोग, उपचार असला तरी जीवघेणा ठरणारा आजार. या आजाराची पहिल्या टप्प्याची चाचणी जिल्हास्तरावर होते; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मशिन नसल्याने नमुना पाठवून माहिती येण्याकरिता किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता वर्धेतील रुग्णांना ही प्रतीक्षा करण्याची गरज नाही. जिल्हा पातळीवरच अवघ्या दोन तासांमध्ये क्षयरोगाच्या दुसऱ्या टप्प्याची एमडीआर चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सीबी नॅट ही अत्याधुनिक मशिन जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्षयरोग कक्षात उपलब्ध करण्यात आली आहे. वर्धेत ही एकमेव मशीन आहे. जिल्ह्यात क्षयरुग्णांची मोठी संख्या आहे. दरवर्षी त्यामध्ये भरही पडत आहे. क्षयरुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र क्षयरोग कक्ष आहे. क्षयरोगाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सहा ते आठ आठवडे नियमित औषधोपचार घ्यावा लागतो; मात्र अनेकदा रुग्ण नियमित औषधोपचार घेत नसल्याने एमडीआर टप्प्यावर हा आजार पोहोचतो. अशा रुग्णांचे निदान करण्यासाठी यापुर्वी जिल्हा पातळीवर मशीन उपलब्ध नव्हते. त्यामुळे नागपूरच्या प्रयोगशाळेत रुग्णाचे नमुने पाठवावे लागत होते. त्यामध्ये बराच वेळ खर्ची व्हायचा. जवळपास पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर नमुन्याची माहिती मिळायची. जिल्हा सामान्य रुग्णालयाला सीबीनॅट ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध व्हावी, अशी मागणी प्रशासनातर्फे करण्यात आली होती. प्रशासनाच्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य विभागातर्फे ही मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या क्षयरोग विभागात उपलब्ध करण्यात आली आहे. या मशिनच्या सहायाने क्षयरोग आणि एमडीआरचे निदान अवघ्या दोन तासांत होणार आहे. परिणामी, वेळेची बचत होऊन रुग्णांना तातडीने औषधोपचारही लवकरच करता येणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)खासगीत एका तपासणीकरिता अडीच हजारांचा खर्च एमडीआर चाचणी करीता जिल्ह्यात एकही मशीन उपलब्ध नाही. ती नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात होते. सोबतच काही खासगी रुग्णालयातही त्याची व्यवस्था आहे. मात्र याकरिता रुग्णाला साधारणता: २ हजार ५०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. या भुर्दंडापासून जिल्ह्यातील रुग्णांची सुटका होणार आहे. शिवाय वर्धेतील दोन मोठ्या रुग्णालयातही मशीन नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात ही एकमेव मशीन असून त्याचा लाभ जिल्ह्यातील क्षयरोग अधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.