शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: April 18, 2016 04:32 IST

रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे लावण्याच्या कारणावरून पोलिसांकडून सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला.

वर्धा : रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे लावण्याच्या कारणावरून पोलिसांकडून सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई द्वेषपूर्ण असल्याचा आरोप करीत लाठीहल्ला करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी विश्वहिंदू परिषदेच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेतून केली.
वर्धा शहरात विविध भागातून रामनवमी शोभायात्रा काढण्यात आली. यात शास्त्री चौक परिसरातील शोभायात्रा सोशालीस्ट चौकाकडे जाण्याकरिता निघाली असता वेळेचे कारण काढून पोलिसांनी यात सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला केला. पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी वंजारी चौक परिसरात सुरू असलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात जेवण करीत असलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
वास्तविकतेत रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने शांतता बैठकीत उन्हाच्या कारणारने मिरवणुकीला एक तासाच्या अधिक अवधीची मागणी केली होती. ती प्रशासनाच्यावतीने मान्य करण्यात आली होती. असे असताना पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कारवाईकरिता न्यायालयात जाणार
४या लाठीहल्ला प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलीस विभागाकडून दुर्लक्ष झाल्यास विश्व हिंदू परिषद न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी प्रशांत बुरले यांनी दिली. येथून आदेश आणत या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
चार्ली पथकावर वचक आवश्यक
४शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने चार्ली पथक तयार करण्यात आले. मात्र या चार्ली पथकाचा लाभ होण्याऐवजी त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. हे पथक आपले कार्यक्षेत्र सोडून काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पथकावर पोलीस विभागाने वचक बसवावा, अन्यथा त्यांना नागरिकांकडून चोप मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे न.प. उपाध्यक्ष कुलधरीया म्हणाले.