शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापणे भोवले; कथित ‘भाई’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

‘भाईगिरी’ची क्रेझ युवकांना असल्याने त्यांनी इतरांसारखे आपणही तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करू असे ठरविले. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने युवक गोमाजी वॉर्डातील चौकात मध्यरात्री एकत्र आले आणि एका टेबलवर सात ते आठ केक ठेवून ते केक धारदार तलवारीने कापले.  काही युवकांनी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बनविला. तो व्हिडीओ गुन्हे शोध पथकाचे प्रमुख विवेक बन्सोड यांना प्राप्त झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कथित ‘भाई’ने मध्यरात्रीच्या सुमारास चौकात युवकांची गर्दी जमवून चक्क तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानुसार पोलिसांनी कथित ‘भाई’चा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना हिंगणघाट येथील संत गोमाजी वॉर्ड परिसरात मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान  घडली. प्रतिक हनुमान ठाकरे (१९) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.  प्रतिकचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी जल्लोषात तो साजरा केला. मात्र, ‘भाईगिरी’ची क्रेझ युवकांना असल्याने त्यांनी इतरांसारखे आपणही तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करू असे ठरविले. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने युवक गोमाजी वॉर्डातील चौकात मध्यरात्री एकत्र आले आणि एका टेबलवर सात ते आठ केक ठेवून ते केक धारदार तलवारीने कापले. काही युवकांनी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बनविला. तो व्हिडीओ गुन्हे शोध पथकाचे प्रमुख विवेक बन्सोड यांना प्राप्त झाला. त्यांनी तत्काळ याची दखल घेत ही बाब पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना सांगितली. दरम्यान, व्हिडिओत तलवारीने केक कापून दहशत पसरविणाऱ्या प्रतिकचा शोध घेत त्यास बेड्या ठोकल्या.  ही कारवाई विवेक बन्सोड, पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले यांनी केली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल... काही दिवसांपूर्वी मुंबई येथील मीरा भाईंदर येथील एका कथिन ‘डॉन’ ने भर चौकात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करीत अटक केली होती. असाच प्रकार हिंगणघाट येथे झाला असून गुन्हेगारी जगताची ‘क्रेझ’ असलेल्या प्रतिकनेही तलवारीने केक कापून व्हिडीओ व्हायरल केला. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस