शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावाचा नफा पालिकेत जमाच नाही

By admin | Updated: August 23, 2014 02:00 IST

सिव्हिल लाईन परिसरात पालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव हा आॅगस्ट २०१० पासून एका कंत्राटानुसार खाजगी कंपनीला देण्यात आले.

रूपेश खैरी वर्धासिव्हिल लाईन परिसरात पालिकेच्या मालकीचा जलतरण तलाव हा आॅगस्ट २०१० पासून एका कंत्राटानुसार खाजगी कंपनीला देण्यात आले. या कंत्राटानुसार झालेल्या नफ्यातील ६० टक्के रक्कम पालिकेला व उर्वरीत ४० टक्के रक्कम कंत्राटदाराला मिळणार होती. सन २०१२-१३ मध्ये तलावाचा निव्वळ नफा २ लाख ८३ हजार ११९ रुपये झाल्याचे दर्शविले आहे. मात्र या नफ्यातील नगरपरिषदेचा ६० टक्के वाटा म्हणजेच १ लाख ६९ हजार ८७१ रुपये पालिकेच्या निधीत जमा करण्यात आला नसल्याचे अंकेक्षण अहवाल सांगतो. यामुळे सदर रक्कम पालिकेला मिळाली किंवा अणखी कुठे गेली याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. जलतरण तलाव कंत्राटावर दिल्यानंतर १ मे २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत पालिकेचे अंकेक्षण झाले. यात या कंत्राटात अनेक त्रुट्या असल्याचा ठपका अंकेक्षकांनी ठेवला आहे. करार करताना मिळणाऱ्या उत्पन्नातून कंत्राटदाराने कोणत्या बाबीकरिता किती खर्च करायचा आहे, याचे निश्चित मानक ठरविले नाही. करारनामा करताना सनातन वित्तव्यवस्थेची स्थूल तत्वे लक्षात घेतली नाहीत. यामुळे या करारातून लाभ पालिकेला वा कंत्राटदाराला असा संशय व्यक्त होत आहे. कंत्राटदाराने देवपुजेसाठी हार पुजेच्या साहित्याकरिता पाच हजार ८७३ रुपयांचा खर्च दाखविला तर ज्यूस पिण्याकरिता चार हजार १८५ रुपये दाखविला आहे. हा खर्च कंत्राटदाराला त्याला मिळणाऱ्या नफ्यातून करायचा होता. एकूण जमा होणाऱ्या रकमेतून हा खर्च करता येत नसतानाही तो करण्यात आला. जलतरण तलावाच्या देखभाल दुरूस्तीकरिता कंत्राटदाराने दोन लाख ५८२ रुपययांचा खर्च केला. हा खर्च करताना करारनाम्यातील अट क्रमांक ७ नुसार हा खर्च पालिकेला कळविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. शिवाय काम करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या नाहीत. तलावाच्या वॉटरप्रुफिंगकरिता एक लाख २५ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे नमुद आहे; मात्र हा खर्च करताना कुठलेही प्राकलन, मोजमाप वा मूल्यांकन झाल्याची नोंद नाही. यामुळे कोणत्या कामाकरिता किती रक्कम वापरल्या गेली अथवा काम झालेच नाही असे अनेक संशय बळावत आहेत. सोबतच फिल्टर प्लँट मेंटनन्सकरिता चार लाख ७४ हजार रुपयांचा खर्च केल्याचे नमुद आहे; परंतु या रकमेत कोणते काम केले याचा उल्लेख नाही. यामुळे पालिकेत झालेल्या कामांत गौडबंगाल झाल्याचा संशय बळावत आहे.