शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

घुई नदीवरील पूल धोक्याचा

By admin | Updated: September 16, 2014 23:57 IST

येथून खापरीकडे जात असलेल्या मार्गावरील घुई नदीवर असलेल्या पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. आजपर्यंत अपघातांत अनेक जण गंभीर झाले.

कोरा : येथून खापरीकडे जात असलेल्या मार्गावरील घुई नदीवर असलेल्या पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. आजपर्यंत अपघातांत अनेक जण गंभीर झाले. परिणामी, या धोकादायक पुलावरुन नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाची उंची वाढवून डागडुजी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या नदीवर हा पूल असून चार किमी अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. घुई नदीचे पात्र लहान असले तरी दरवर्षी पावसाळ्यात नदीला मोठा पूर येत असल्यामुळे पुलावरून पाणी वाहते. परिणामी, पुलावर खोल खड्डे पडले असून सळाखी उघड्या पडल्या आहेत.या मार्गाने शेगाव, भद्रावतीकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसभर वर्दळ असते. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरुच असते. आजपर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वाहने खड्ड्यातून उसळून नदीच्या पात्रात पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावरील सळाखी उघड्या पडल्याने दुचाकीसह मोठी वाहने वारंवार पंक्चर होतात. या मार्गावर परिसरातील शेतकऱ्यांची शेती आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे व सळाखी उघड्या पडल्याने बैलांच्या पायांना दुखापत होते. अनेकदा भरधाव वाहने पुलावरील खड्ड्यांमध्ये फसत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांचा लांब रांगा लागतात. या पुलावर नेहमी अपघात होत असल्याने परिसरातील जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलाची उंची वाढवून डागडूजी करून होणारा त्रास थांबवावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)