शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचा बडगा उगारताच आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: January 14, 2016 02:47 IST

भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेत देवळी पोलीस अटकेच्या कारवाईसाठी आरोपीच्या घरी गेले.

चिखली येथील घटना : आरोपी उपचारार्थ सामान्य रुग्णालयातदेवळी : भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेत देवळी पोलीस अटकेच्या कारवाईसाठी आरोपीच्या घरी गेले. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने आरोपीने विषारी औषध प्राशन केले. पोलिसांसमोरच ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. आरोपीला उपचारार्थ वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना चिखली येथे बुधवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडली. पोलीस सुत्रानुसार, घटनेतील आरोपी पांडुरंग नारायण ठाकरे याच्या विरूद्ध त्याचा भाऊ विजय नारायण ठाकरे यांनी देवळी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी हा नेहमी अश्लील शिवीगाळ करतो. हातात कुऱ्हाड घेऊन गावात दहशत निर्माण करतो. शिवाय विष देऊन कोंबड्या मारल्याचे विजय ठाकरे याने तक्रारीत नमूद केले होते. यावरून देवळी पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. अटकेच्या कारवाईसाठी देवळी पोलीस त्याच्या चिखली येथील राहत्या घरी दाखल झाले. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच आरोपीने स्वत:चे घरात जाऊन उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने आरोपीला उपचारासाठी वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात गोंधळ उडाला होता.(प्रतिनिधी)