शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली.

ठळक मुद्देसंडे अँकर । आर्वी नाका ते जुनापाणी चौक मार्ग, अल्पावधीतच पितळ उघडे, ‘पॅचिंग’चे काम युद्धस्तरावर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी नाका चौक ते जुना पाणी चौकापर्यंत रस्त्याला कित्येक ठिकाणी भेगा गेल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याला ठिगळं लावण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवली असून हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली. तरीदेखील कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम सुरूच ठेवले. रस्ता बांधकाम करताना आर्वी मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. राजकीय पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अतिक्रमणकर्त्यांकडे डोळेझाक करण्यात आली. याशिवाय अनेक ठिकाणचे वीजखांबही हटविण्यात आले नाही. रस्त्याचे बांधकाम करताना गुणवत्तेचा विचारच झाला नाही. त्यामुळे आज वाहनांच्या आवागमनामुळे अनेक ठिकाणचे सिमेंट निघून जात आहे. तर ठिकठिकाणी शेकडोवर भेगा पडलेल्या असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने पॅचिंगचे काम मागील आठवडाभरापासून युद्धतस्तरावर सुरू आहे. अल्पावधीतच रस्त्याचे पितळ उघडे पडल्याने गैरप्रकार झाल्याचीही आता ओरड होत आहे. रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला निधी पाण्यात गेल्याचेही नागरिक बोलत आहेत.आर्वी मार्गालगत नालीचे नियमबाह्य बांधकामआर्वी मार्गालगत नालीचे बांधकाम केले जात आहे. यात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. नाल्या उंच बांधण्यात आल्या असून जुन्या नाल्यांशी त्या मिळत नसल्याने या नाल्यांमधील पाणी जुन्या नाल्यांमध्ये येत आहे. शिवाय नालीचे बांधकाम सरळ न करता नागमोडी पद्धतीने करण्यात आले आहे. याला देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या अभियंत्यांचीही मूकसंमती असल्याचे दिसून येते. नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना देयकेही अदा केली जात असल्याने बांधकाम विभागाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.हा रस्ताही ठरला विकासाचा ‘नमुना’छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले. मात्र, रस्ता सिमेंटीकरणानंतर चेंबरवर झाकणे बसविण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी चेंबर व तर कुठे खाली असल्याने वाहनचालकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्याचे बांधकामही शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक