शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनासाठी १ लाख २८ हजार लसींचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

पावसाळ्यात जनावरांना विविध आथीचे आजार उद्भवू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८९ हजार पशुधन : पशुसंवर्धन विभागाकडून मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व जनावरांची काळजी व आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत मान्सूनपूर्व जनावरांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण १ लाख २८ हजार लससाठा उपलब्ध झाला असून एकूण ४ लाख ८९ हजार पाळीव जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.पावसाळ्यात जनावरांना विविध आथीचे आजार उद्भवू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते. तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनाचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार, लाळ खुरकूत, तोंडखुरी आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात १०६ पशुवैद्यक दवाखाने असून या दवाखान्यांना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. गाई-म्हशींकरिता घटसर्पच्या ४८ हजार, एकटांग्या ५२ हजार आणि शेळ्यांकरिता आंत्रविषारच्या २८ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात गाई आणि म्हशींची संख्या ३ लाख २२ हजार ५२९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९ तर ५ हजार ३५८ मेंढ्यांची संख्या आहे. पशुसंवर्धन विभागाच्या फिरते पथकाद्वारे जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.शेतकरी पशुपालकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती माधन चंदनखेडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. आर. वानखेडे, डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी केले आहे.पशुपालकांना आवाहनजिल्ह्यात जिल्हा परिषद आणि राज्य शासन असे एकूण १०६ पशुवैद्यक दवाखाने असून या सर्व दवाखान्यांना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. या दवाखान्यांमार्फत पशुधनाला लसीकरण करण्यात येणार आहे. पशुपालकांनी जनावरांच्या संरक्षणासाठी लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी