शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘पेरते व्हा़़़धूळ पेरणीला प्रारंभ’

By admin | Updated: June 14, 2014 01:18 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धूळ पेरणीस प्रारंभ झाला आहे़

तळेगाव (टा़) : दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धूळ पेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़ सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी ‘पेरते व्हा’चा संदेश देत धूळ पेरणी आटोपती घेतल्याचे दिसते़परिसरात ओलिताची सोय असल्यानेही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणीवर अधिक भर देतात़ मागील वर्र्षी मृग नक्षत्रात पाऊस आल्याने कपाशी व सोयाबीनची पेरणी आटोपली होती; पण यंदा आठवडा लोटूनही पावसाचे संकेत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणीस प्रारंभ केला आहे़ गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने नाल्याच्या काठावर शेत असलेल्या शेतकऱ्यांचे पीक खरडून गेले़ सोयाबीनसह रबी पिकालाही फटका बसला. शेतकऱ्यांनी उन्हाची तमा न बाळगता लग्नकार्य आटोपून मान्सूनपूर्व मशागतीची कामे पूर्ण केलीत़ सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धूळ पेरणीसाठी सरसावले असले तरी भारनियमनामुळे तेही अशक्य होत आहे. पाऊस आल्यास घाई होऊ नये म्हणूनही शेतकरी धूळ पेरणी करीत आहे. काही शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असताना ते धुळपेरणी करण्यास धजावत नाही तर काही कोरड्यामध्ये लावण करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाण्यांचे भाव वाढले असून उगवण शक्तीबाबत साशंकता आहे़ यामुळे बहुतांश शेतकरी कपाशीची लागवड करीत असल्याचे दिसते़ मागील वर्र्षी सोयाबीनला अंकुर फुटल्याने ३० किलोची बॅग २ हजार ५०० रुपयांवर मिळत आहे़ असे असले तरी बियाणे गुणवत्तापूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना एक एकर शेतात ४० ते ४५ किलो बियाणे खर्ची घालावे लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप बँकेचे कर्ज न मिळाल्याने बियाणे खरेदी लांबली आहे़ मागील वर्षी उत्पन्ना घट झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. यामुळे अनेकांना कर्ज अदा करता आले नाही़ यंदा दागिने गहाण करून वा सावकाराकडून आणून कर्ज फेड करून नवीन कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे़ आजही अनेक शेतकरी कर्ज मंजुर होण्याच्या प्रतिक्षेत आहे.(वार्ताहर)