शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पेरते व्हा़़़धुळपेरणीला प्रारंभ’

By admin | Updated: June 15, 2014 23:41 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धुळपेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़

बळीराजाला पावसाची प्रतीक्षा : महागड्या बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीततळेगाव (टा़) : दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात धुळपेरणीस प्रारंभ झाला आहे़ मृग नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्नात भर पडते, असा समज आहे़ काही शेतकरी वेळेवर मजूर व बैलजोडी मिळत नाही म्हणूनही धुळपेरणी करतात़ सध्या परिसरातील शेतकऱ्यांनी ‘पेरते व्हा’चा संदेश देत धुळपेरणी आटोपती घेतल्याचे दिसते़परिसरात ओलिताची सोय असल्यानेही शेतकरी मान्सूनपूर्व पेरणीवर अधिक भर देतात़ मागील वर्र्षी मृग नक्षत्रात पाऊस आल्याने कपाशी व सोयाबीनची पेरणी आटोपली होती; पण यंदा आठवडा लोटूनही पावसाचे संकेत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धुळपेरणीस प्रारंभ केला आहे़ गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने नाल्याच्या काठावर शेत असलेल्या शेतकऱ्यांचे पीक खरडून गेले़ सोयाबीनसह रब्बी पिकालाही फटका बसला. शेतकऱ्यांनी उन्हाची तमा न बाळगता लग्नकार्य आटोपून मान्सूनपूर्व मशागतीची कामे पूर्ण केलीत़ सिंचनाची सोय असल्याने शेतकरी धुळपेरणीसाठी सरसावले असले तरी भारनियमनामुळे तेही अशक्य होत आहे. पाऊस आल्यास घाई होऊ नये म्हणूनही शेतकरी धुळपेरणी करीत आहे. काही शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असताना ते धुळपेरणी करण्यास धजावत नाही तर काही कोरड्यामध्ये लावण करीत आहेत़ यावर्षी सोयाबीन बियाण्यांचे भाव वाढले असून उगवण शक्तीबाबत साशंकता आहे़ यामुळे बहुतांश शेतकरी कपाशीची लागवड करीत असल्याचे दिसते़ मागील वर्र्षी सोयाबीनला अंकुर फुटल्याने ३० किलोची बॅग २ हजार ५०० रुपयांवर मिळत आहे़ असे असले तरी बियाणे गुणवत्तापूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना एक एकर शेतात ४० ते ४५ किलो बियाणे खर्ची घालावे लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप बँकेचे कर्ज न मिळाल्याने बियाणे खरेदी लांबली आहे़ मागील वर्षी उत्पन्ना घट झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत आहे. यामुळे अनेकांना कर्ज अदा करता आले नाही़ यंदा दागिने गहाण करून वा सावकाराकडून आणून कर्ज फेड करून नवीन कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे़ आजही अनेक शेतकरी कर्ज मंजुर होण्याच्या प्रतिक्षेत आहे.(वार्ताहर)