वर्ध्यासह नऊ गावात स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:07+5:30

वर्धा शहरात शनिवारी रुग्णालय आणि मेडिकल्स शॉप वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर नागरिकांनी घरात राहून जनता कफ्यूला प्रतिसाद दिला. वर्धा शहरातील विविध भागात पोलिसांकडून नाकेबंदी करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्धा शहर पोलिसांच्या चमूने विनाकारण फिरणाऱ्यांच्या २३ दुचाकी तर सहा चार चाकी वाहने जप्त केली.

Spontaneous public curfew in nine villages including Wardha | वर्ध्यासह नऊ गावात स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू

वर्ध्यासह नऊ गावात स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू

ठळक मुद्देव्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद ; नियम तोडणाऱ्यांवर झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वर्धा उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीवर राहिल्याने उपन्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी सक्तीच्या संचारबंदीच्या आदेश पारीत करून पुढील तीन दिवस नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आवाहनाला शनिवारी वर्धेसह परिसरातील नऊ गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देणाऱ्यांवर १२ विशेष चमूंनी दंडात्मक कारवाई केली.
वर्धा शहरात शनिवारी रुग्णालय आणि मेडिकल्स शॉप वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर नागरिकांनी घरात राहून जनता कफ्यूला प्रतिसाद दिला. वर्धा शहरातील विविध भागात पोलिसांकडून नाकेबंदी करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्धा शहर पोलिसांच्या चमूने विनाकारण फिरणाऱ्यांच्या २३ दुचाकी तर सहा चार चाकी वाहने जप्त केली. शिवाय विना मास्क फिरणाऱ्या चौघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रामनगर पोलिसांच्या चमूने ३२ व्यक्तींवर कारवाई केली. तर तहसील कार्यालयाच्या तीन तर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील दोन चमूनेही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. खबरदारीचा उपाय म्हणून १३ जुलैपर्यंत वर्धा शहरासह परिसरातील नऊ गावांमध्ये सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Web Title: Spontaneous public curfew in nine villages including Wardha