शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा जवळपास ६० ते ७० टक्के माल निघाला आहे. शेतकरी आपला शेतमाल मार्केटमध्ये ...

ठळक मुद्देसरकारचा दावा खोटा : शेतकऱ्यांची आर्वी बाजार समितीत ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील शेतकऱ्यांचा जवळपास ६० ते ७० टक्के माल निघाला आहे. शेतकरी आपला शेतमाल मार्केटमध्ये विकायला जात असतांना शेतकऱ्यांना तुमचा माल ओला आहे. या सबबीखाली सोयाबीनचे हमी भावांपेक्षा कमी भाव देण्यात येत असल्याची शेतकºयाची ओरड आहे.पहिलेच पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला उतारा कमी मिळाला आहे. काही मालाची गुणवत्ता ही घसरल्यासारखी दिसत आहे. त्यामध्ये शेतकरी आपला माल मार्केटमध्ये विकण्याकरिता आणल्यानंतर तुमचा माल ओला आहे या सबबीखाली लुट होत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी आपला माल पाण्यात न सापडता चांगला पध्दतीने निघावा याकरिता थ्रेशर मशीन वाल्याला दामदुप्पटीने पैसे देत आहे.असे असले तरी मार्केटमध्ये आल्यानंतर मात्र त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये कमालीचा रोष आहे.शेतकºयांकडून विकण्याकरिता आणलेली सोयाबीन १४ ते १५ टक्के ओले असल्यास ३२०० ते ३३०० रूपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे १८ ते २० टक्के माल ओला असल्यास १९०० ते ३००० रूपये प्रतिकिंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाच्या माल जरी कमी प्रमाणात ओलसर असला तरी तुमचा माल अधिक प्रमाणात ओला आहे. असे सांगून भाव कमी देत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे दररोज शेकडो पोते माल खरेदी केल्या जात आहे. १४ आॅक्टोंबरला सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला असून आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने ३००० पोते सोयाबीन खरेदी केली.दिवाळीमुळे बाजारसमितीत आवक वाढलीदिवाळी सण तोंडावर आलेला असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन निघताच थेट शेतातून कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन येत आहे. त्यामुळे आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारपेठेत सध्या सोयाबीनला ३४०० रूपयांवर भाव दिला जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतमाल विक्रीसाठी आणलेला नाही ते भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत.हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी मिळत आहे. माल थोडा ओलसर असल्यामुळे प्रमाणापेक्षा अधिकच कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.- गजानन राजेंद्र सावरकर, लाडेगावलहान शेतकºयाला दिवाळी सणासाठी पैसे लागणार आहे.त्यामुळे त्यांना सोयाबीन विकावे लागते. सोयाबीनला सध्या कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांवर अन्याय होत आहे.- नितीन इरखडे, शेतकरी राजापूर

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड