शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे ‘सायबर कॅफे’ धोक्यात

By admin | Updated: May 23, 2014 00:09 IST

स्मार्टफोन आणि टूजी, थ्रीजी सेवांमुळे शहरासह जिल्हाभरातील २५४ सायबर कॅफे सध्या कुलूपबंद अवस्थेत दिसून येत आहेत़ स्मार्टफोनच्या अतिक्रमणामुळे सायबर कॅफे हा व्यवसायच धोक्यात

वर्धा : स्मार्टफोन आणि टूजी, थ्रीजी सेवांमुळे शहरासह जिल्हाभरातील २५४ सायबर कॅफे सध्या कुलूपबंद अवस्थेत दिसून येत आहेत़ स्मार्टफोनच्या अतिक्रमणामुळे सायबर कॅफे हा व्यवसायच धोक्यात आल्याचे चित्र आहे़ यामुळे सदर व्यावसायिकही हैराण झाले आहेत़ अवघ्या जगाला एका क्लिकवर जोडणार्‍या इंटरनेटमुळे गत काही वर्षांत सायबर कॅफेची दुकाने शहरासह ग्रामीण भागात सुरू झाली होती. दीड-दोन वर्षापर्यंत हा व्यवसायही चांगला चालला़ विविध जागांचे अर्ज भरणे, ई-मेलसह इतर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी अनेकजण इंटरनेटसाठी सायबर कॅफेवर येत होते. अनेक शासकीय कार्यालयांतही इंटरनेट नसल्याने तेथील अधिकारी, कर्मचारीही या कॅफेमध्ये दिसून येत होते़ फेसबुक, आॅर्कुट यासह इतर सोशलसाईटवर चॅटिंगसाठीही अनेकजण या कॅफेमध्ये गर्दी करीत होते़ शिवाय आॅनलाईन गेम खेळण्याचा छंद असलेले अनेक युवकही या कॅफेत तासन्तास बसत असल्याने हा व्यवसायही चांगल्या पद्धतीने चालत होता़ मोजक्याच व्यक्तींच्या घरी संगणक, लॅपटॉप असल्याने घरगुती इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या तोकडीच होती; पण लॅपटॉपसह संगणकाचे दर कमी झाले व इंटरनेटची सुविधा अल्पदरात मिळू लागल्यानंतर अनेकांनी इंटरनेटचा घरगुती वापर सुरू केला. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक युवकांसह, युवती, महिलांच्याही हातात स्मार्ट फोन खणखणू लागले आहेत. या स्मार्ट फोनवरच टूजी, थ्रीजी सेवा उपलब्ध होत असल्याने कोठेही आणि कधीही इंटनरेटवरील कामे करता येतात़ यामुळे अनेकांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. घर असो वा शेत तेथे मोबाईलवरून कामे करणे सुलभ झाले आहे. शिवाय लॅपटॉपवरही मोबाईल कार्ड वापरून इंटरनेट वापरता येणे शक्य झाले आहे. स्पर्धेच्या युगातील या सर्व बाबींमुळे शहरासह जिल्हाभरातील सायबर कॅफे कुलूपबंद दिसू लागली आहेत. अनेकांनी दुकानांना कायमचे टाळे ठोकून इतर व्यवसायास पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ युवकांनी छंदाचे रूपांतर या व्यवसायात केले होते; पण मोबाईलच्या युगात आता हा हायटेक व्यवसायही मागे पडल्याचे दिसून येत आहे़ यामुळे अनेक युवकांना दुसरा व्यवसाय शोधावा लागत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)