शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टन्सिंग नॉर्मल मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देवर्धेकर रस्त्यावर : भाजीबाजार व पेट्रोलपंपावर वाढतेय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी कोरानाला रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर कार्य करीत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. पण, सध्या बहुतांश ठिकाणी याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. दिवस उजाडताच वर्धेकर रस्त्यावर गर्दी करीत असल्याने अजुनही कोरोना आजाराबाबत नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे.कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.त्यामुळे शहरातील किराणा, औषधी, धान्य, भाजीपाल्याची दुकाने सुरु आहे. यासोबतच पेट्रोलपंपही सुरु असून आता सोमवार व मंगळवारी इलेक्ट्रिक आणि ऑटोमोबाईचे दुकान सुरु ठेवण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. या ठिकाणी गर्दी टाळण्याकरिता सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करणे बंधनकारक केले आहे. मात्र, मंगळवारी ठिकठिकाणी याची पूर्णत: वाट लागल्याचे दिसून आहे. शहरातील दोन ठिकाणी असलेल्या भाजीबाजारात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हेच चित्र बजाज चौकातील पेट्रोलपंपावरही होते.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि स्वावलंबी शाळेच्या मैदानावर भाजी व फळबाजार सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी दुकानदारांनी चुन्याने बॉक्स तयार केले होते. आता दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे हे बॉक्स दिसेनासे झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नव्याने बॉक्सची आखणी करण्यात आली नाही. परिणामी याचाच फायदा बेफिकरे वर्धेकर घेताना दिसून येत आहे.ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांकडून वारंवार सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासंदर्भात पेट्रोलपंप मालक व दुकानचालकांना सूचना केल्या जात असतानाही कानाडोळा होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानंतरही वर्धेकरांनी सध्यातरी कोरानाच्या प्रकोपात सोशल डिस्टन्सिंगला नॉर्मल मोडवर टाकल्याचे दिसून येत आहे.शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच सुरु होतेय वाहनांची वर्दळकोरोना आजार हा महत्त्वाच्या टप्प्यात असताना प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पण, वर्धेकर अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. मंगळवारी ऑटोमोबाईल, भाजीबाजारासह शहरातील मुख्य मार्गाने दुपारपर्यंत वाहनांची चांगलीच वर्दळ पहावयास मिळाली. निर्मल बेकरी मार्ग व शनिमदिर मार्गावरही वाहनांची चांगलीच गर्दी होती. बजाज चौकातील पेट्रोल पंपावरही वाहन चालक सामाजिक अंतर न पाळता गोळा झाले होते. त्यामुळे आता तरी सतर्क होण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक