सहा गावांना वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:05+5:30

वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या बनावटीची आणि मातीची आहेत.

Six villages hit with rainstorm | सहा गावांना वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका

सहा गावांना वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्दे४० घरांची पडझड : अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, नुकसानीच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नजीकच्या रसुलाबाद परिसरात वादळीवाºयासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे रसुलाबादसह बाºहा सोनेगाव, साटोडा, टेंभरी परसोडी, पाचोड, विरुळ या गावातील सुमारे ४० घरांची पडझड झाली आहे. यात सदर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून काहींच्या घरावरील टिनपत्रेच उडून गेली. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासून ढगाळी वातावरण असले तरी दुपारी १२ च्या सुमारास ऊन निकाल्याने अनेकांनी शेतीची वाट धरली. अशातच डोक्यावरील सुर्यनारायण पश्चिमेच्या दिशेने थोडा सरकताच वातावरणात बदल होत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान रसुलाबाद परिसरातील सुमारे १२, बाऱ्हा सोनेगाव या गावातील आठ, साटोडा गावातील आठ, टेंभरी परसोडी गावातील १३, पाचोड गावातील सात तर विरुळ गावातील सुमारे ८ घरांवरांचे नुकसान झाले आहे. ही सर्व घर जुन्या पद्धतीच्या बनावटीची आणि मातीची आहेत. पावसादरम्यान सदर नुकसानग्रस्तांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. माहिती मिळताच रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, ग्रामविकास अधिकारी बोबडे, तलाठी भोले, कोतवाल अरुण हेंडवे, पोलीस पाटील श्याम काकडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. वृत्तलिहिस्तोवर नुकसान झालेल्या घरांची आकडेवारी जूळवणे सुरू होते. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे.

नारा येथे वीज पडून पाच गार्इंचा मृत्यू
कारंजा (घा.) - मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. याच दरम्यान नारा परिसरात वीज पडल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. यामुळे पशुपालकाचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी जनावर चारण्यासाठी नेण्यात आली. पाऊस सुरू झाल्याने जनावरांनी झाडाचा आधार घेतला. पण याच दरम्यान वीज पडल्याने झाडाखाली असलेल्या पाच गाई जागीच ठार झाल्या. सुदैवाने गुराखी घटनास्थळापासून दूर असल्याने तो थोडक्यात बचावला. वृत्तलिहिस्तोवर नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव कळू शकले नाही.

१० शेळ्यांसह ११ कोंबड्या ठार
वडनेर - वडनेर नजीकच्या गांगापूर गावात सोमवारी मुसळधार पावसादरम्यान घर कोसळले. यात १० शेळी व ११ कोंबड्या ठार झाल्या. यामुळे पशुपालक शंकर देवराव अलाम यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री वडनेर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. याच पावसादरम्यान शंकर अलाम यांनी चराई नंतर बकºया बांधलेल्या घराचा काही भाग कोसळला. या घरात कोंबड्याही होत्या. या अपघातात दहा बकऱ्यांसह ११ कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे शंकर अलाम यांचे सुमारे १ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
 

Web Title: Six villages hit with rainstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस