शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे निदान करण्यासाठी आता ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे तसेच प्रवास करणाºयांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºयांना गृह विलगीकरणात किंवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणे दिसत नसून प्रत्येकाची चाचणी करणे शक्य नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील किंवा क्वारंटाईन असलेल्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी या टेस्टचा उपयोग केल्या जाणार आहे.

ठळक मुद्देनवीन उपाययोजना : ‘एक म्नििट सिट-अप टेस्ट’चाही आहे पर्याय, दत्तपूर येथील प्रतिबंधित क्षेत्रात आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबविल्या जात आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाला ब्रेक लावण्यात प्रशासनाला बऱ्या प्रमाणात यशही आले आहे. आता याच उपाययोजनांमध्ये ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ आणि ‘एक मिनीट सिट-अप टेस्ट’ ची भर पडली आहे. या दोन टेस्टच्या आधारे प्रतिबंधित क्षेत्रातील क्वारंटाईनमध्ये असलेल्यांचे निदान केले जाणार आहे. याची सुरुवात आज दत्तपूर येथील प्रतिबंधित क्षेत्रातून करण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे तसेच प्रवास करणाºयांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºयांना गृह विलगीकरणात किंवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणे दिसत नसून प्रत्येकाची चाचणी करणे शक्य नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील किंवा क्वारंटाईन असलेल्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी या टेस्टचा उपयोग केल्या जाणार आहे. या टेस्टव्दारे व्यक्तीची ऑक्सिजन पातळी मोजून कोरोनाचे निदान करणार आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रातील व क्वारंटाईन असलेल्यांची माहिती संकलीत करण्याचे कार्य आशा सेविकांकडून केले जात आहे. त्यामुळे त्यांना रुग्णांचीही माहिती मिळावी, याकरीता ‘सिक्स मिनीट वॉक टेस्ट’ आणि ‘एक मिनीट सिट-अप टेस्ट’ ची माहिती देण्यात आली.या टेस्टच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरीही रुग्णांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. दत्तपूर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वैद्यकीय जनजागृती मंच आणि आयएमएच्या संयुक्त विद्यमाने याचे प्रात्याक्षिक करून दाखवत आशा सेविकांना माहिती देण्यात आली. यावेळी ४६ जणांची ही टेस्ट घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी बोरकर, डॉ. किमया गंधे, आयएमएचे डॉ. संजय मोगरे, डॉ. विपीन राऊत, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सचिन पावडे उपस्थित होते. यादरम्यान जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी भेट देत माहिती घेतली. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी होते.यंत्रणेकडून अशी केली जाणार ही चाचणी‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ मध्ये सलग सहा मिनीट चालायचे आहे तर ‘एक मिनीट सिट-अप टेस्ट’ मध्ये एक मिनीट उठाबशा काढायच्या आहेत. जे चालू शकत नाही त्यांच्यासाठी ‘एक मिनीट सिट-अप टेस्ट’ हा पर्याय आहे. यातून शरीरात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरने टेस्ट पूर्वी आणि टेस्टनंतर तपासले जाणार आहे. ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली असल्यास रुग्ण गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याची शक्यता असल्याने त्यास उपचारार्थ दाखल केले जाणार आहे. यामध्ये कोविडच नव्हे तर अस्थमा, दमा, हृदयरोग, इतर आजाराचीही माहिती मिळू शकते.आयसीएमआरने शिफारस केलेली ही चाचणी आहे. अनेकादा आजाराची लक्षणे दिसत नाहीत. सहा मिनीट चालल्यास ऑक्सिजनची पातळी माहिती होऊन आजाराविषयी माहिती मिळते. यातून रुग्णाची लवकर माहिती मिळणे शक्य होते. पुढील काळात इतर कन्टेनन्मेंट झोनमध्ये ही टेस्ट करण्याचा प्रयत्न राहील.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य