शहीद भूषण दांडेकर अमर रहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:27+5:30

मोरांगणा या छोट्याशा गावातून २०११ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शहीद भूषण दांडेकर देशसेवेकरिता सैन्यात दाखल झाले. मराठा लाईट इफंन्ट्रीमध्ये ९ वर्षे सेवा दिली. यादरम्यान त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफल या ठिकाणी सेवा दिली. त्यांची शेवटची पोस्टिंग कर्नाटक मधील बेळगाव येथे होती. कर्तव्यावर असताना १३ फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला.

Shaheed Bhushan Dandekar... Amar Rahe ... | शहीद भूषण दांडेकर अमर रहे...

शहीद भूषण दांडेकर अमर रहे...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मोरांगणा) : मोरांगणा येथील रहिवासी असलेला जवान भूषण दांडेकर यांचा हृदयविकाराने काल मृत्यू झाला. आज स्वगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे...अमर रहे...शहीद भूषण दांडेकर अमर रहे...अशा घोषणा देण्यात आल्या.
मोरांगणा या छोट्याशा गावातून २०११ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शहीद भूषण दांडेकर देशसेवेकरिता सैन्यात दाखल झाले. मराठा लाईट इफंन्ट्रीमध्ये ९ वर्षे सेवा दिली. यादरम्यान त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रायफल या ठिकाणी सेवा दिली. त्यांची शेवटची पोस्टिंग कर्नाटक मधील बेळगाव येथे होती. कर्तव्यावर असताना १३ फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला. त्यात ते भोवळ येऊन खाली कोसळल्याने सुरुवातीला बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुण्यातील कमांडो रुग्णालयात हलविण्यात आले. येथेच त्यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्यांचे पार्थिव मोरांगणा येथे आणण्यात आले. देशासाठी शहीद झालेल्या भूषणचे अंत्यदर्शन घेण्याकरिता पंचक्रोशीतील जनसमुदाय उसळला होता. दुपारी १२ वाजता गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी स्वागत करून अमर रहे...च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मोरांगणा येथील शहीद स्मारकावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान भूषणच्या लहान भावाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, बाळा जगताप, जिल्हा परिषद सदस्य राजश्री राठी, पंचायत समिती सभापती हनुमंत चरडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विनायक मगर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर, मराठा बटालियनचे नायब सुभेदार तेजस घागडे, नरेंद्र वैद्य, लक्ष्मीकांत टेंभरे, नरहरी बिडकर, सुधीर खोडके, मनोज पांडे, संदीप सोळंकी, सतीश वाणी, श्याम हरणे, मुरली चौधरी, रवी चौधरी, कर्नल चित्तरंजन चवडे, श्याम आकोलकर, ज्ञानेश्वर भुजबळ यांची उपस्थिती होती. पुलगाव येथील पथकाने आकाशात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक हुसेन कादर शहा यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त होता.
 

Web Title: Shaheed Bhushan Dandekar... Amar Rahe ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.