एकाच दिवशी सात पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:04+5:30

रविवारी पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती वर्धा शहरातील गोंड प्लॉट भागातील रहिवासी असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात आल्याने त्यांचे चार वर्षीय दोन मुलं, एक आठ वर्षीय मुलगी तसेच ३८ वर्षीय पत्नीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.

Seven positive patients on the same day | एकाच दिवशी सात पॉझिटिव्ह रुग्ण

एकाच दिवशी सात पॉझिटिव्ह रुग्ण

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात खळबळ : दोन महिला तर पाच पुरुष, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीसह मुलांनाही संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरोग्य विभागाला रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार तब्बल सात नवीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या नवीन रुग्णांमध्ये दोन महिला तर पाच पुरुषांचा समावेश आहे. मागील चार महिन्यांत एकाच दिवशी सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने सात नव्या कोरोना रुग्णाच नोंद घेतली असली तरी यापैकी एक बिहार येथील आहे. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बिहार सरकारला दिली आहे.
रविवारी पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती वर्धा शहरातील गोंड प्लॉट भागातील रहिवासी असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात आल्याने त्यांचे चार वर्षीय दोन मुलं, एक आठ वर्षीय मुलगी तसेच ३८ वर्षीय पत्नीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. तर आर्वी येथील रामदेवबाबा वॉर्ड भागातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत काम करणाऱ्या ३९ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील पाच रुग्णांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात तर दोन व्यक्तींना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

आर्वीतील रुग्ण भाजी विक्रेता
आर्वी शहरातील रामदेवबाबा वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या २३ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. सदर रुग्ण भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होता. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने तो शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

दुसºया दिवशीही पाळला जनता कर्फ्यू
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वर्धा शहरासह नजीकच्या नऊ ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात तीन दिवसीय सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करून या परिसरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी केले. त्यांच्या आवाहनाला रविवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही वर्धेसह परिसरातील नागरिकांनी घरात राहून स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.

जिल्ह्याची रुग्णसंख्या ४३
रविवारी सात व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी त्यापैकी एक व्यक्ती हा बिहार राज्यातील आहे. आज सहा कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांचे संख्या ४३ झाली आहे. एकाच दिवशी सात व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

केवळ सुरू राहिले मेडिकल्स आणि खासगी रुग्णालये
संचारबंदीचा दुसरा दिवस असलेल्या रविवारी वर्धा शहरासह परिसरातील नऊ ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात केवळ मेडिकल्स आणि रुग्णालय सूरू होती. तर इतर दुकाने व्यावसायिकांनी बंद ठेवली होती.

आठ व्यक्तींना भोवला पिपरी(मेघे)तील विवाहसोहळा
सावंगी (मेघे) येथील एका खासगी विद्यालयात खेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आणि पिपरी (मेघे) येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाच्या लग्नात सहभागी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा कोविड अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. हा नवीन रुग्ण गोंड प्लॉट येथील रहिवासी असून या नव्या रुग्णामुळे लग्न सोळ्यातील कोविड बाधितांची संध्या आता आठ झाली आहे.

पिपरीच्या लग्नामुळे ग्रामीण भागात एन्ट्री
पिपरी (मेघे) येथील विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी आतापर्यंत नवरदेव, नवरी, नवरीनच्या दोन मैत्रिणी, नवरदेवाची आई, नवरदेवाचा मामेभाऊ आणि मामे बहीण, मामा असे एकूण आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. पिपरीच्या या लग्नामुळे ग्रामीण भागातही कोरोनाची एन्ट्री झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Web Title: Seven positive patients on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.