शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

By admin | Updated: September 9, 2014 00:33 IST

दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सात जलाशय १०० टक्के भरले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे १५ दार उघडण्यात आली.

वर्धा : दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गत ४८ तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील सात जलाशय १०० टक्के भरले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे १५ दार उघडण्यात आली. यातून २३४ क्यसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाले फुगले आहेत. पुलगाव येथे असलेल्या वर्धा नदीवरील लहान पुलावरून पाणी गेल्याने या मार्गाची वाहतूक बंद झाली. यशोदा नदीचे पाणी सरूळ येथील पुलावरून पाणी गेल्याने वर्धा-कापसी-राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संतधार पावसामुळे देवळी तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. सारवाडी येथे सोमवारी दुपारी एक घर पडल्याने तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. गत २४ तासात जिल्ह्यात ५९३.२० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील देवळी, वर्धा, सेलू व समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. देवळी तालुक्यात १६५ मि.मी पाऊस झाला. वर्धा तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून ९६.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. समुद्रपूर तालुक्यात ८० मि.मी. पाऊस, सेलू तालुक्यातही ६७ मि.मी. पाऊस झाला. आर्वी तालुक्यात ३७ मि.मी., आष्टी तालुक्यात ४७.२० मि.मी. आणि कारंजा तालुक्यात ३६.३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष सरासरी पाऊस ७४.१५ इतका झाला आहे. पावसाच्या हजेरीमुळे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाची पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील लघु प्रकल्प असलेली कवाडी, सावंगी, लहादेवी, अंबाझरी, पांजरा, बोथली, उमरी जलाशये पूर्णत: भरली आहेत. तसेच आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा १ आणि रोठा २, आष्टी, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हरासी ही जलाशयेही पूर्णत: भरलेली असून त्यांच्या सांडव्यावरून प्रवाह सुरू आहे.