शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील सेवाच ‘व्हॅटिलेटर’च्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण याच कामाच्या ओघात त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना असह्य असा किडनी स्टोनचा त्रास जानवू लागल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देतज्ज्ञांना आजारांनी ग्रासले : शल्य चिकित्सकांनी वेळीच पर्यायी यंत्रणा उभी करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू आणि गरिबांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवाच सध्या व्हॅटिलेटरच्या उंबरठ्यावर आली आहे. विशेष म्हणजे कासवगतीने का होई ना पण कोविड-१९ हा विषाणू या रुग्णालयातील तज्ज्ञांना सध्या आपल्या कवेत घेत आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये  कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सकांनी वेळीच पर्यायी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. तशी कुजबूज सध्या या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पण याच कामाच्या ओघात त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना असह्य असा किडनी स्टोनचा त्रास जानवू लागल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोल येळणे, नेत्र तज्ज्ञ रंजना वाढवे, डॉ. संजय दाडे यांना कोविड संसर्ग झाल्याने ते सध्या गृहअलगीकरणात आहेत. तर कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आल्याने प्रसुती तज्ज्ञ डॉ. मनिषा नासरे या सध्या गृहविलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे त्यांची ॲन्टिजेन किटद्वारे केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला प्राप्त झालेला नाही. हळूहळू का होई ना पण कोविड विषाणू सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या कवेत घेत असल्याने  जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड ब्लॉस्ट होण्यापूर्वी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणी दबक्या आवाजात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली केली जात आहे.

अनेकांनी केली कोविडवर मातजिल्हा सामान्य रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी बहूतांश अधिकारी व कर्मचारी कोविडवर विजय मिळवित कर्तव्यावर रुजू झाले आहे. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या