शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर परिसरात मृत अर्भकामुळे खळबळ

By admin | Updated: January 15, 2016 02:50 IST

रामनगर येथील जैन मंदिराच्या परिसरातील एका मोकळ्या भुखंडात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळलेल्या मृत अर्भकामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली.

श्वान व वराहांच्या कळपामुळे घटना उघड वर्धा: रामनगर येथील जैन मंदिराच्या परिसरातील एका मोकळ्या भुखंडात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळलेल्या मृत अर्भकामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. अर्भक कुजलेल्या स्थितीत असल्याने ते किती दिवसांपूर्वीचे होते या संदर्भात तपास सुरू आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. घटनास्रूथळ रामनगर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी पाहणी केली असता सदर अर्भक पुलिंगी असल्याचे समोर आले. येथील एसटी डेपो मार्गलगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर श्वान व वराहांच्या कळपात झुंज सुरु होती. तेथून जात असलेल्या एका इसमाने श्वानांना हाकलून घटनास्थळाकडे दृष्टी फिरविल्यास त्याला येथे एक अर्भक मृतावस्थेत असल्याचे दिसले. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून अर्भक ताब्यात घेतले. ते उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे कृत्य कोणाचे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून संगण्यात आले आहे. सदर अर्भक कुजलेल्या अवस्थेत असल्याने ते एका दिवसाचे नसून काही दिवसांपूर्वीचे असावे असा संशय पोलिसांच्यावतीने करण्यात आला आहे. हे अर्भक येथे टाकण्यात आले नसून ते श्वानांनी दुसऱ्या ठिकाणावरून उचलून आणले असावे, असाही संशय आहे. घटना उघड होताच ती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पाहाता पाहता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान घटनास्थळी रामनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठात ते अर्र्भक ताब्यात घेतले. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी येथील नगरसेविका योगिता इंगळे यांचे पती संजय इंगळे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अज्ञात महिलेविरूद्ध भादंविच्या कलम ३१८ कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. हे कृत्य कोणाचे या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची चमू तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)