शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीजे प्रवर्गातील विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित

By admin | Updated: September 10, 2014 23:54 IST

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त भटक्यां प्रवर्गातील मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अनेक विद्यार्थिनींची शिष्यवृती २००६ पासून शासनाकडेच प्रलंबि

वर्धा : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त भटक्यां प्रवर्गातील मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अनेक विद्यार्थिनींची शिष्यवृती २००६ पासून शासनाकडेच प्रलंबित असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही शिष्यवृती लवकरात लवकर देण्याची मागणी भोई समाज क्रांती दलाच्या वतीने संबंधितांना करण्यात येत आहे. इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत समाजकल्याण विभाग वर्धा तसेच ८ वी ते १० वी पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, वर्धा या कार्यालयामार्फत भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना शिष्यवृती दिली जाते. परंतु २००६ पासून ५ वी ते ७ वीची १ कोटी ११ लाख ९० हजार ९२० रुपये शिष्यवृत्ती तर ७ लाख १३ हजार १०० रुपये गुणवत्ता शिष्यवृत्ती अशी एकूण १ कोटी १९ लाख ४ हजार २० रुपयांची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित आहे. ८ वी ते १० वी चीही शिष्यवृत्ती शिल्लकच आहे. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना बँकेत खाते उघडण्यास सांगितले. परंतु मुलींच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमाच झालेली नाही. याची चौकशी करून तातडीने ही शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी भोई समाज क्रांती दलच्या वतीने करण्यात आली.शिष्टमंडळात भोई समाज क्रांती दल शाखा, हिंगणघाटचे अध्यक्ष अशोक मोरे, सदस्य रमेश ढाले, धर्मदास गाढवे, सुभाष कोल्हे, शंकर बावणे, सुधाकर जोगे, विक्की कापटे, राजु पढाल, राजु ढाले, शुभम मोरे, रामा मोरे, लक्ष्मण कापटे, इश्वर सुरजुसे, प्रकाश सुरजुसे, प्रशांत लांडगे, शंकर मोरे, सचिन मोरे, श्रावण मोरे, उत्तम मोरे, अरूण बावणे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)