शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गरीब लाभार्थ्यांना धान्य वाटपाची योजना अंधातरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

संचारबंदीच्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचित व उपाशी राहू नये यासाठी ज्या लोकांजवळ शिधापत्रिका आहे, परंतु धान्य मिळत नाही तसेच ज्या कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही व त्यांना धान्याची गरज आहे, अशांचा या याद्यांमध्ये समावेश करण्यात आला. या सर्व घडामोडीला चार दिवसांचा अवधी होऊन गेला. अद्याप जिल्हास्तरावर याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने योजनेबाबत अनिश्चितता वाढली आहे. शासन म्हणून पालकमंत्री यांचा धोरणात्मक निर्णय हवेत विरणार का, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणात्मक निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कोरोनाच्या संक्रमणात सर्वांना धान्य मिळणार असल्याची भूमिका जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा बैठकीत बोलून दाखविली. नव्हे, तर जिल्हाधिकारी यांनी तशा प्रकारचे आदेश काढून शासनाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे गरजू लाभार्थ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. संचारबंदीच्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचित व उपाशी राहू नये यासाठी ज्या लोकांजवळ शिधापत्रिका आहे, परंतु धान्य मिळत नाही तसेच ज्या कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही व त्यांना धान्याची गरज आहे, अशांचा या याद्यांमध्ये समावेश करण्यात आला. या सर्व घडामोडीला चार दिवसांचा अवधी होऊन गेला. अद्याप जिल्हास्तरावर याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने योजनेबाबत अनिश्चितता वाढली आहे. शासन म्हणून पालकमंत्री यांचा धोरणात्मक निर्णय हवेत विरणार का, असे बोलले जात आहे.कोरोनाच्या संकटात शासनाने शिधापत्रिकेवर तीन महिन्यांचे धान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. त्यानुसार जुलै महिन्याचे धान्य वाटप केले जात आहे. यामध्ये प्रतिमाणसी पाच किलो याप्रमाणे पंतप्रधान योजनेतील विनामूल्य तांदळाचा समावेश आहे. नेहमीचे बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच धान्याचे वाटप केले जात आहे. यामध्ये नव्याने याद्या तयार केलेले गरजू लाभार्थी या पासून वंचित ठरले आहे. या लाभार्थ्यांत पांढरी शिधापत्रिकाधारक ९०८, केसरीधारक २००२ ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही; परंतु धान्याची आवश्यकता असलेल्या २,१४९ कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबात एकूण सात हजार व्यक्तींचा समावेश असून ही यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. ही यादी ऐनवेळेवर ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रतिनिधींकडून घेण्यात आल्याने क्रॉक चेकिंगचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.गरजू लाभार्थ्यांच्या याद्या बनवून शासनाने त्यांना अन्नधान्याबाबत आशेचा किरण दाखविला आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या वेळी ते लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित ठरू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक