शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रशिया,युकेच्या टपाल पार्सल सेवेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 5:00 AM

एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने विभागाकडून पार्सल सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेही रशिया आणि युकेची टपाल सेवा थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे. 

ठळक मुद्देमहसूल बुडण्याची शक्यता : ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनचा परिणाम, खबरदारी म्हणून घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून काही देशांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, टपाल विभागाकडून रशिया आणि युकेची टपाल पार्सलसेवा थांबविण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक देशांनी त्यांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली होती. संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनमुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्धवली आहे. केंद्र सरकारने रशिया आणि युकेची आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवरच नाही तर सर्व प्रकारच्या आयात निर्यातीवरही झाला आहे. बुधवारी टपाल विभागाच्या केंद्रीय कार्यालयाकडून रशिया आणि युके या दोन्ही देशांची पार्सल बुकिंग तत्काळ थांबविण्याच्या सूचनाचे पत्रक मुख्य टपाल कार्यालयास दिले आहे. लगेचच टपाल विभागाकडून रशिया आणि युकेची आंतराष्ट्रीय पार्सल सेवेची बुकिंग बंद केली आहे. त्यामुळे या देशांची टपाल विभागाची पार्सलसेवा कोलमडली आहे. टपाल विभागाला पार्सलच्या बुकिंगच्या माध्यमातून मिळणारा महसूलही बुडण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती विभागाने दिली आहे.

वर्षात दुसऱ्यांदा सेवा झाली बंद एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने विभागाकडून पार्सल सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेही रशिया आणि युकेची टपाल सेवा थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे. 

नागपूर येथून जातात पार्सलवर्धा शहरात विमानसेवा नसल्याने आंतराष्ट्रीय टपाल पार्सल नागपूर  किंवा मुंबई येथील विमानसेवेद्वारा संबंधित देशात पाठविण्यात येत होते. मात्र, ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनमुळे आंतराष्ट्रीय टपाल सेवा बंद करण्यात आल्याने सध्या वर्धा टपाल सेवेद्वारा रशिया आणि युकेच्या टपाल पार्सल सेवा थांबविण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

नुकतेच शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले असून रशिया आणि युके या दोन देशात जाणाऱ्या टपाल पार्सल सेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातून दोन ते तीन टपाल पार्सल या देशात पाठविल्या जात होते. मात्र, ब्रिटनमधील नव्या स्ट्रेन विषाणूमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रशिया आणि युकेच्या टपाल पार्सल सेवा बंद आहे. - अविनाश अवचट, पोस्टमास्तर मुख्य डाकघर वर्धा.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInternationalआंतरराष्ट्रीय