शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे धावपळ

By admin | Updated: October 27, 2014 22:42 IST

या आठवड्यातील सततच्या ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कापनी झालेल्या सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांना

सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक खरेदीचा भुर्दंडसेलू : या आठवड्यातील सततच्या ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कापनी झालेल्या सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात भोगावा लागत आहे. अशात आलेल्या पावसात जर उत्पन्न ओले झाले तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवीत आहे. नाममात्र सोयाबीन होण्याची स्थिती आहे. कापलेले सोयाबीन ठिग लावून शेतात ठेवले. मळणीपूर्वीच पावसाची रिपरिप सुरू झाली. सोयाबीन ओले होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ढीग झाकण्यासाठी आर्थिक सोय नसतांना ताडपत्री व प्लास्टिक खरेदी करून ढीग झाकण्याचा सपाटा लावला आहे. कापूस शेतात ओला होत आहे. वेचणीसाठी मजुरांची अडचण आहे. कापसाची वेचणी झाल्यावर काही वर्षापूर्वी वेचणाऱ्या महिला डोक्यावर गाठोडे घेऊन यायच्या. आता घरापर्यंत गाठोडे आणण्यासाठी शेतमालकाला चारचाकी वाहन किंवा बैलबंडीची व्यवस्था करावी लागते. एवढा सर्व खर्च केल्यावर शेतकऱ्यांकरिता काही शिल्लक राहील, याचा भरवसा नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दरवर्षी नवीन आशा घेऊन पेरते होणाऱ्या शेतकऱ्यास मळणीच्या वेळेस किंवा शेतमाल विकताना प्रचंड आर्थीक फटका बसतो. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे ताळमेळ बसत नाही. शासनाने शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे भाव निर्धारीत केले नाही तरी शेतकऱ्याच्या नशीबी त्याच हालअपेष्टा कायम राहणार आहे. ढगाळ वातावरणात जर पाऊस आला तर त्याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर झाल्याखेरीज राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)