शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 29, 2014 22:54 IST

यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़

वायगाव (नि़) : यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़ महावितरणने याकडे लक्ष देत भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे़ सध्या कपाशीचे पीक चांगले बहरले आहे; पण पाणी नसल्याने कुरपत असल्याचे दिसते़ विहीर व पंप असलेले शेतकरी कपाशी तरी हाती यावी म्हणून ओलित करीत आहेत; पण महावितरणच्या भारनियमनाने शेतकऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडित होतो़ यामुळे शेतकऱ्यांना रात्रीही शेतात ओलित करावे लागत आहे़ रात्री भारनियमन केले जात असल्याने तेही शक्य होताना दिसत नाही़ यामुळे रात्र थोडी सोंगे फार प्रमाणे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात येरझारा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे़ वीज पुरवठा सुरू झाला की पुन्हा शेतात जाऊन पंप सुरू करणे, ओलित करणे आणि मधेच वीज खंडित झाली तर पुन्हा घरी परतणे, असा नित्यक्रम परिसरातील शेतकऱ्यांचा सुरू आहे़ रात्री शेतात ये-जा करावी लागत असल्याने वन्य प्राण्यांचा धोकाही निर्माण झाला आहे़ असे असले तरी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावेच लागत आहे़ याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करून रात्री भारनियमन करावे, अशी विनंती केली; पण उपयोग झाला नाही़ यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)