शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर तांबेरा रोगाचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 01:59 IST

यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली.

शेतकरी हवालदिल : उडीद, मूग, पिके पडली पिवळीसेलगाव (लवणे) : यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कशीबशी पिकांची वाढ झाली. सध्या परिस्थितीत पिके फुले व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानांच सोयाबीन, उडीद, मुग या पिकांवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.प्रारंभी हा रोग उडीद पिकांवरील पानांवर आढळला. उडीदावर पिवळे डाग पडायला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण पिकच पिवळे झाले. त्यानंतर याचाच परिणाम मुंग व मुख्य सोयाबीन पिकांवरही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. कारण या तांबेरा रोगांमुळे पिकांना धरलेल्या शेंगातील दाणे अपरिपक्व राहतात व वजनाने हलके राहतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसून येत आहे.गत तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे. निसर्ग कधी अवकाळी पाऊस, गारपीट, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ अशा अनेक संकटाचा सामना करीत शेती करून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांवर या रोगामुळे पुन्हा मागचे दिवस पुढे येणार तर नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण होत आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.(वार्ताहर)