आर्वीच्या दोन प्रभागातील नागरिकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 AM2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:01:11+5:30

आकोला येथील २४ वर्षीय महिला एक महिन्याचे बाळ व पतीसह चारचाकी वाहनाने आर्वीतील सिंदी कॅम्प परिसरात माहेरी आली. तिला माहेरी सोडून पती व वाहनचालक पुन्हा अकोल्याला निघून गेले. महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला गृह विलगीकरणात ठेवून त्याचे स्वॅब अहवाल तपासणीकरिता पाठविले होते. आज अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये महिला ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

Restrictions on citizens in two wards of RV | आर्वीच्या दोन प्रभागातील नागरिकांना प्रतिबंध

आर्वीच्या दोन प्रभागातील नागरिकांना प्रतिबंध

Next
ठळक मुद्देप्रभाग क्रमांक ३ व ६ चा समावेश : माहेरी आलेल्या महिलेचा अहवाल आला पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/ आर्वी : शहरामध्ये होम क्वारंटाईन असलेल्या महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णाच्या घराकडे धाव घेत प्रभाग क्रमांक ३ व प्रभाग क्रमांक ६ मधील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे आता या परिसरातील जवळपास दोनशे घरांतील नागरिकांना १४ दिवसापर्यंत प्रतिबंध घालण्यात आले आहे.
आकोला येथील २४ वर्षीय महिला एक महिन्याचे बाळ व पतीसह चारचाकी वाहनाने आर्वीतील सिंदी कॅम्प परिसरात माहेरी आली. तिला माहेरी सोडून पती व वाहनचालक पुन्हा अकोल्याला निघून गेले. महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला गृह विलगीकरणात ठेवून त्याचे स्वॅब अहवाल तपासणीकरिता पाठविले होते. आज अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये महिला ही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाने लगेच सिंधी कॅम्प परिसराकडे धाव घेत तिला बाळासह पुढील तपासणीकरिता सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्रमांक ३ व प्रभाग क्रमांक ६ मधील काही परिसरात कंटेन्मेट झोन तर उर्वरित परिसरात बफर झोन जाहीर केला आहे. रुग्णाच्या अतिसंपर्कातील ५ तर कमी संपर्कातील १६ असे एकूण २१ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे. यापैकी १२ व्यक्तींना हैबतपूर येथे तर उर्वरित व्यक्तींना उपजिल्हा रुग्णायलात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता पाठविले जाणार आहे.

शहरातील हे आहेत कंटेन्मेंट झोन व बफर झोन
कंटेन्मेट झोन : नगरपरिषद आर्वी प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक ३ यामधील उत्तरेकडील निरंजन वानखेडे यांच्या घरापासून सार्वजनिक शौचालय ते मशिद कॉर्नर, पश्चिमेकडील मशिद कॉर्नरपासून इकबाल सॉ मिल ते विठ्ठल मंदिर (तलाव रोड), दक्षिणेकडील विठ्ठल मंदिरपासून गुरुनानक धर्मशाळा ते गहूकर यांच्या नाल्याजवळील शेतापर्यंत तर पूर्वेकडील गहूकर यांच्या नाल्याजवळील शेतापासून निरंजन वानखेडे यांच्या घरापर्यंत.
बफर झोन : कंटेन्मेंट क्षेत्र वगळता आर्वी नगरपरिषद हद्दीचे संपूर्ण क्षेत्र.

एकाच दिवशी दोन रुग्णांची भर
जिल्ह्यात हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज एकाच दिवशी दोन रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची १९ वर पोहोचली आहेत. यामध्ये वर्ध्यातील ८, वाशीम १, अमरावती ४, नवी मुंबई ३, गोरखपूर १, ओडिशा १ व अकोला येथील १ रुग्णाचा समावेश आहे. यापैकी वर्ध्यातील एक रुग्ण मृत आहे.

सावंगीच्या परिचारिकेची नातेवाईक युवती कोरोनाबाधित
सावंगी येथील परिचारिका कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाकडून तिच्या पतीसह चौघांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी १९ वर्षीय युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर तिघांचे निगेटिव्ह आले आहेत. या कोरोनाबाधित युवतीला पुढील तपासणीकरिता सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२० हजारांवर नागरिकांचे सर्वेक्षण
जिल्ह्यातील वर्धा, हिंंगणघाट, आर्वी व आष्टी या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार त्या परिसरात क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना राबविण्यात येत आहे. सध्या या चारही तालुक्यांमध्ये ६ कंटेन्मेट झोन जाहीर केले असून त्या ठिकाणी ९४ सर्वेक्षण पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. आतापर्यंत २० हजार ७३१ नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.

राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, सिंधी कॅम्प परिसरातील रहिवासी महिला कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रतिबंधित उपाययोजना सुरु केल्या. या परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला असून येथे जाण्या-येण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले. अत्यंत महत्त्वाच्या कामाकरिता पूर्व परवानगी व ओळखपत्रासह जाण्या-येण्याकरिता विठ्ठल मंदिराजवळ मार्ग देण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी, आर्वी.

सिंधी कॅम्प परिसर आणि राणी लक्ष्मीबाई वॉर्डाचा संपूर्ण परिसर चारही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. या परिसरातील दोनशे कुटुंबियांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
डॉ.संगीता झोपाटे, तालुका आरोग्य अधिकारी, आर्वी

Web Title: Restrictions on citizens in two wards of RV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.