शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची वाट पाहतेय लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० वाजता आष्टी साठी बस सोडली जाते. त्यानंतर दर एक तासाने बसचे शेड्युल असून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बसगाडी नाही.

ठळक मुद्देप्रवाशांतही भितीचे वातावरण : आर्वीच्या बसस्थानकातील वास्तव

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : कोरोणा विषाणूचा प्रादुभार्वावर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्यातरी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरीला जिल्ह्यांतर्गत फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र लालपरीची प्रवाशांनी धास्ती घेतल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अत्यल्प प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू आहे ५५ प्रवाशाची क्षमता असलेल्या बसमध्ये केवळ ५ ते ७ प्रवासी असल्याने बसमधील सोशल डिस्टन्सिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० वाजता आष्टी साठी बस सोडली जाते. त्यानंतर दर एक तासाने बसचे शेड्युल असून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बसगाडी नाही. ७ शेड्युलमध्ये १४ चालक वाहक आहे दररोज सात ते आठ हजार किलोमीटरचा प्रवास सध्या या बसेस करतात या सात बसेसचे उत्पन्न किमान तीस हजार दररोज अपेक्षित आहे. मात्र दररोज सात ते आठ हजार रुपयाची आवक असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांचा पगार ही यात निघत नाही. सध्या २० ते ३० च्या दरम्यान लोड फॅक्टर आहे. हा ५० ते ६० च्या दरम्यान असावयास पाहिजे होता. मंगळवारी २०० प्रवासी तर बुधवारी १९२ प्रवाशांनी या मार्गावर जाणे-येणे केल्याची नोंद आहेआर्वी आगारात ९६ चालक ९६ वाहक आहे तर २३ चालक-वाहक (टू-इन-वन) आहे २३ मेकॅनिकल आणि १२ कार्यालयीन स्टॉप तर आठ वाहतूक नियंत्रक आहेत. आगार व्यवस्थापक व वाहतूक निरीक्षक आणि इतर असे एकूण २६१ कार्यरत कर्मचारी आर्वी आगारात कार्यरत आहेत. या आगारात ४४ बसेस असून दररोज १९ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास या बसेस करीत होत्या. साधारणत दररोज साडेपाच ते सहा लाख रुपये उत्पन्न होते. उन्हाळ्याच्या दिवसात विवाह सोहळ्याचे ९ ते १० लाखाचे उत्पन्न दरवर्षी होते आणि इतर उत्पन्न स्त्रोत वेगळेच होते मात्र आता कोरोणाच्या प्रादुभार्वाने विवाह सोहळे लॉकडाऊन झाले आहे तेरावी चौदावी , बारसे मुंज, साक्षगंध आदी विविध कार्यक्रम समारंभ, पाहूनपण ,सर्वच लॉकडाऊन झाल्याने प्रवाशांची ये-जा थांबली आहे. त्यामुळे फार मोठा फटका लाल परीच्या आर्थिक व्यवहारावर पडल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.सध्या आर्वी वर्धा, आणि आर्वी आष्टी या मार्गावर सात शेडूल सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू आहे तसेच दररोज बसेस अल्टरनेट केल्या जातात मंगळवारी २२२ प्रवासी तर बुधवारी १९३ प्रवाशांची ये-जा होती लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्यापासून तर सर्वच कार्य स्थगित असल्याने त्याचा परिणाम प्रवाशावर झाला आहे. तर परिणामी आर्वी आगारचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले आहे.- विनोद खंडार, वाहतूक निरीक्षक, आर्वी

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या