शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी मार्गावरील गतिरोधकाला परिवहन प्राधिकरणाची मान्यता

By admin | Updated: February 23, 2017 00:52 IST

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या सभेमध्ये आर्वी-वर्धा मार्गावरील पिपरी तंत्रनिकेतन येथे गतिरोधक बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

रामदास तडस यांची माहिती : बांधकाम विभागाला आदेश निर्गमित वर्धा : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या सभेमध्ये आर्वी-वर्धा मार्गावरील पिपरी तंत्रनिकेतन येथे गतिरोधक बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. याबाबत खासदार रामदास तडस यांनी संबंधीत विभागाल पत्र दिले होते. यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली. गतिरोधक देण्याचा विषय या सभेत प्रामुख्याने मांडण्यात आला. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. या मार्गावर विविध महाविद्यालयातून ३-४ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेकदा विद्यार्थ्यांना वाहनांची धडक बसून अपघात होतो. याकरिता दौलतसिंग विद्यालय, ग्रामविकास तंत्रनिकेतन पिपरी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिपरी, रामकृष्ण बजाज कृषी विद्यालय, रूरल इन्स्टिट्युट समोर शाळा असल्याबाबतचा निर्देष फलक आणि गतिरोधक बसविण्याबाबत प्रादेशिक परिवहन यांनी मान्यता प्रदान केली. येथे गतिरोधक बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देण्यात आला आहे. येथे गतिरोधक असल्याचा फलक लावण्यात यावा, असे नमुद केले आहे. आचार्य तंत्रनिकेतन येथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. खासदार रामदास तडस यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. त्यामुळे येथील समस्या सभेमध्ये चर्चेकरिता ठेवण्यात आली. यापूर्वी खासदार तडस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला शैक्षणिक संस्था व विद्यार्थी वर्गाच्या मागणीच्या आधारे पत्र देवून गतिरोधक देण्याच्या सूचना केल्या. परंतु गतिरोधक बसविण्याकरिता परिवहन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक असल्याने हा विषय प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासमोर ठेवण्यात आला. या विषयाला सभेत मान्यता प्रदान करण्यात आली. या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)