शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राधिका रेस्टॉरेंटचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

राधिका रेस्टॉरेंटमधील आईस्क्रीममध्ये मृत कीटक आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हॉटेलची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ च्या अनेक तरतुदींचे सर्रास उल्लंघन, शिवाय हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

ठळक मुद्देकिचनसह सर्वत्र आढळली अस्वच्छता : पाच दिवस हॉटेल बंद ठेवण्याचे ‘एफडीए’चे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत शहरातील प्रमुख मार्गावरील राधिका रेस्टॉरेंटचा परवाना पाच दिवसांकरिता निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली.राधिका रेस्टॉरेंटमधील आईस्क्रीममध्ये मृत कीटक आढळल्याच्या तक्रारीवरून अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी २२ नोव्हेंबर रोजी हॉटेलची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ व नियमन २०११ च्या अनेक तरतुदींचे सर्रास उल्लंघन, शिवाय हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी रेस्टॉरेंटच्या संचालिका सुनीता सुनील मुरारका यांना सुधारणा नोटीस बजावली होती. सुधारणा करण्याकरिता पुरेसा कालावधीदेखील दिला होता. फेरतपासणीदरम्यान रेस्टॉरेंटमालकाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.आढळलेले दोष, कायद्याचे उल्लंघन याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी धाबर्डे यांनी पुढील आदेशाकरिता प्रकरण सहाय्यक आयुक्त (अन्न) तसेच परवाना अधिकारी जयंत वाणे यांच्याकडे सादर केले होते. अस्वच्छतेच्या कारणावरून हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे राधिका रेस्टॉरेंटचा परवाना १३ ते १७ डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीकरिता निलंबित करण्यात आला आहे. निलंबन कालावधीत रेस्टॉरेंटद्वारे अन्नपदार्थांचे उत्पादन, वितरण, खरेदी आणि विक्री करण्यात येऊ नये, असे लेखी आदेशही रेस्टॉरेंट मालक सुनीता मुरारका यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक हॉटेलमध्ये अस्वच्छता असते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशीच हॉटेलमालकांचा खेळ सुरू आहे. येत्या काळात या हॉटेल्सची तपासणी, कारवाई होणार आहे.नाताळ आणि नववर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्वच हॉटेल्सची धडक मोहिमेंतर्गत तपासणी केली जाणार असून अन्नसुरक्षा व मानदे कायदा व नियमन २०११ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या तसेच स्वच्छतेचे निकष न पाळणाऱ्या हॉटेल, पेढ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- जयंत वाणे, परवाना अधिकारी तथा सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, वर्धा.

टॅग्स :hotelहॉटेल