शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पाच किलो तांदूळ घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

स्वस्त धान्य दुकानचालकांनी सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने आखणी केली. मात्र, शेडअभावी उन्हात रांगा लावून धान्य उचल करताना लाभार्थ्यांना त्रास होतो. वृद्ध व शाळकरी मुले तसेच महिलांना कोरोनाच्या दहशतीतही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी : सर्वांनाच मोफत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून नियमित धान्याच्या वितरणाव्यतिरिक्त प्राधान्य व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो याप्रमाणे धान्यवाटप सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे दुकानांसमोर रांगा आहे.स्वस्त धान्य दुकानचालकांनी सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने आखणी केली. मात्र, शेडअभावी उन्हात रांगा लावून धान्य उचल करताना लाभार्थ्यांना त्रास होतो. वृद्ध व शाळकरी मुले तसेच महिलांना कोरोनाच्या दहशतीतही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.स्वस्त धान्य दुकानातून प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ विनामूल्य वाटप सुरू आहे. मात्र, एपीएलमध्ये असणाऱ्या शेतकरी शिधापत्रक धारकांना हा विनामूल्य तांदूळ मिळणार नसल्याने त्यांना आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटत आहे. शासनाने पाच किलो तांदूळ प्रतिव्यक्ती सर्वांनाच मोफत द्यायला पाहिजे, अशी मागणी होत आहे.उनञहाचे चटके सोसत लाभार्थ्यांकडून धान्याची उचलसेलू विशाल विविध कार्यकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानासह सेलूच्या सिंदी सहकारी खरेदी विक्रीच्या दुकानातूनही लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जात आहे. मात्र, लांबच लांब रांगामुळे उन्हाचे चटके लाभार्थ्यांना सहन करावे लागत आहेत.कोरोनात जनावरांचीही हेळसांडसेलू- कोरोना संसर्गाच्या भीतीने गुरढोरे पाळणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. घरातच त्यांच्या चाºया पाण्याची व्यवस्था करावी लागत असून त्यांच्यासाठी हिरवा चाराही विकत घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसमोर कोरोनाने त्यांच्यासह जनावरांसाठीही संकटच उभे केले आहे. उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा विकत घेऊन खाऊ घालणे खिशाला परवडणारे नाही. मात्र, पशुपालक स्वत:पेक्षाही जनावरांची जास्त काळजी घेतात. खुराक व हिरव्या चाºयाची व्यवस्था करतो. बैलगाडीतून किंवा छोट्या वाहनातून हा चारा घरी नेऊन साठवून ठेवण्याचा दिनक्रम पशुपालकांसाठी नित्याची बाब झाली आहे. दूध संकलन केंद्रावर दूध खरेदी केले जात नाही. घरगुती दूध विकत घेणाºयाकडे दारोदार भटकूनही नाममात्र प्रतिसाद मिळतो. मात्र, जनावरांची खुराक, वैरण व हिरवा चारा जनावरांना चारावा लागतो. शेतकरी व पशुपालकांना खिशाला परवडत नसले तरी जनावरांची सोय करावीच लागते. कोरोनामुळे बाहेर फिरण्यास मज्जाव असल्याने सर्व कामावर परिणाम झाला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक