पाच किलो तांदूळ घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:17+5:30

स्वस्त धान्य दुकानचालकांनी सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने आखणी केली. मात्र, शेडअभावी उन्हात रांगा लावून धान्य उचल करताना लाभार्थ्यांना त्रास होतो. वृद्ध व शाळकरी मुले तसेच महिलांना कोरोनाच्या दहशतीतही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.

Queue in front of a cheap grain shop to grab five kilos of rice | पाच किलो तांदूळ घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा

पाच किलो तांदूळ घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा

Next
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी : सर्वांनाच मोफत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून नियमित धान्याच्या वितरणाव्यतिरिक्त प्राधान्य व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो याप्रमाणे धान्यवाटप सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे दुकानांसमोर रांगा आहे.
स्वस्त धान्य दुकानचालकांनी सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने आखणी केली. मात्र, शेडअभावी उन्हात रांगा लावून धान्य उचल करताना लाभार्थ्यांना त्रास होतो. वृद्ध व शाळकरी मुले तसेच महिलांना कोरोनाच्या दहशतीतही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.
स्वस्त धान्य दुकानातून प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ विनामूल्य वाटप सुरू आहे. मात्र, एपीएलमध्ये असणाऱ्या शेतकरी शिधापत्रक धारकांना हा विनामूल्य तांदूळ मिळणार नसल्याने त्यांना आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटत आहे. शासनाने पाच किलो तांदूळ प्रतिव्यक्ती सर्वांनाच मोफत द्यायला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

उनञहाचे चटके सोसत लाभार्थ्यांकडून धान्याची उचल
सेलू विशाल विविध कार्यकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानासह सेलूच्या सिंदी सहकारी खरेदी विक्रीच्या दुकानातूनही लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जात आहे. मात्र, लांबच लांब रांगामुळे उन्हाचे चटके लाभार्थ्यांना सहन करावे लागत आहेत.

कोरोनात जनावरांचीही हेळसांड
सेलू- कोरोना संसर्गाच्या भीतीने गुरढोरे पाळणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. घरातच त्यांच्या चाºया पाण्याची व्यवस्था करावी लागत असून त्यांच्यासाठी हिरवा चाराही विकत घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसमोर कोरोनाने त्यांच्यासह जनावरांसाठीही संकटच उभे केले आहे. उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा विकत घेऊन खाऊ घालणे खिशाला परवडणारे नाही. मात्र, पशुपालक स्वत:पेक्षाही जनावरांची जास्त काळजी घेतात. खुराक व हिरव्या चाºयाची व्यवस्था करतो. बैलगाडीतून किंवा छोट्या वाहनातून हा चारा घरी नेऊन साठवून ठेवण्याचा दिनक्रम पशुपालकांसाठी नित्याची बाब झाली आहे. दूध संकलन केंद्रावर दूध खरेदी केले जात नाही. घरगुती दूध विकत घेणाºयाकडे दारोदार भटकूनही नाममात्र प्रतिसाद मिळतो. मात्र, जनावरांची खुराक, वैरण व हिरवा चारा जनावरांना चारावा लागतो. शेतकरी व पशुपालकांना खिशाला परवडत नसले तरी जनावरांची सोय करावीच लागते. कोरोनामुळे बाहेर फिरण्यास मज्जाव असल्याने सर्व कामावर परिणाम झाला आहे.

Web Title: Queue in front of a cheap grain shop to grab five kilos of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.