शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीपासून पुलगावकर वंचितच

By admin | Updated: May 22, 2016 01:52 IST

मुंबई, कोलकाता या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसलेले शहर गत पाच दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे.

रोजगार मिळेणा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षपुलगाव : मुंबई, कोलकाता या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर बसलेले शहर गत पाच दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सर्वच भौगोलिक परिस्थिती उपलब्ध असताना शहरात अद्याप औद्योगिक वसाहतीची स्थापनाही होऊ शकलेली नाही. परिणामी, बेरोजगारी वाढत असून रोजगार मिळेणासा झाला आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त होत आहे.शहरातून नागपूर-मुंबई हा द्रुतगती मार्ग व हैद्राबाद-भोपाल हा महामार्ग तसेच धारणी ते अहेरी हा राज्य महामार्गही गेला आहे. शहरालगतच वर्धा नदी वाहत आहे. असे असताना हे शहर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिले आहे. भोसले कालीन राजवटीतून शहर व परिसराला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व होते. भोसले व इंग्रजांना या भागाचे महत्त्व कळले म्हणून त्यांनी वर्धा नदीवर मोठा रेल्वे पूल बांधला. इंग्रज राजवटीत नागपूरच्या बुटी परिवाराला महत्त्व कळले व त्यांनी या शहरात १८८९ पुलगाव कॉटन मिल्स हा मोठा वस्त्रोद्योग सुरू केला. यानंतर याच राजवटीत १९४२ मध्ये इंग्रजांनी केंद्रीय दारूगोळा भांडाराची निर्मिती करून पुलगाव शहराच्या विकासाची दालने खुली केली. १५ आॅगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला खरा; पण हे शहर विकासात्मक बाबतीत पाच दशकांत मागेच राहिले. नवीन उद्योग तर आले नाहीच, उलट चार हजार कामगारांना रोजगार देणारा पुलगाव कॉटन मिल हा मोठा वस्त्रोद्योग लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे एक दशकापेक्षाही अधिक वर्षापासून बंद पडला आहे. मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या बी.ई.सी. फर्टिलाइझर या खत कारखान्यालाही घरघर लागली आहे. चार महिन्यांपूर्वी शहरात मंत्री प्रविण पोटे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असताना नागरिकांनी याबाबत विचारणा केली. यावर पोटे यांनी, तुम्ही जागा द्या, मी औद्योगिक वसाहत देतो, असे म्हटले होते. सत्तेत असलेल्या व्यक्तींनी अशी उत्तरे देणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जागेसाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)