पुलगाव पंचधारा स्मशानभूमीचा वाद संपुष्टात

By Admin | Updated: April 17, 2016 01:58 IST2016-04-17T01:58:12+5:302016-04-17T01:58:12+5:30

पुलगाव स्मशानभूमी सौदर्यीकरणाचे दोन कोटीची कामे नगर परिषद व दारूगोळा भंडार व्यवस्थापन यांच्यातील जागेच्या वादामुळे रखडले होते.

Pulgaon Panchdhara cremation ground | पुलगाव पंचधारा स्मशानभूमीचा वाद संपुष्टात

पुलगाव पंचधारा स्मशानभूमीचा वाद संपुष्टात

खासदारांची माहिती : बांधकाम पूर्ववत सुरू होणार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
वर्धा : पुलगाव स्मशानभूमी सौदर्यीकरणाचे दोन कोटीची कामे नगर परिषद व दारूगोळा भंडार व्यवस्थापन यांच्यातील जागेच्या वादामुळे रखडले होते. हा वाद संपुष्टात आला असून बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक घेण्यात आली.
तत्पूर्वी खा. तडस व कमान्डन्ट ब्रिगेडीयर संजय शेट्टी यांची बैठक झाली होती. समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांनी भेट घेतली होती. प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. तडस यांनी समन्वय बैठक घेतली. बैठकीमध्ये शासनातर्फे एस.एल.आर. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, तालुका भूमिलेख अधिकारी कराळे, पुलगाव न.प. च्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन बडगे, प्यारेलाल रामटेके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचधारा स्मशानभूमीची जमीन महाराष्ट्र शासनाची असल्याने व पुलगाव न.प. स्मशानभूमी सार्वजनिक प्रयोजनाकरिता वापरत असल्याने तसा प्रस्ताव रक्षा विभागाकडे पाठविण्याचे ठरले.
सदर प्रस्ताव रक्षा विभागाकडून मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदारांनी दिली. पुलगाव येथील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले पंचधारा स्मशानभूमीचे काम त्वरित सुरू होणार असल्याची माहितीही खा. तडस यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)

प्रशासन व सिएडीची समन्वय सभा
पंचधारा स्मशानभूमीचे बांधकाम खा. तडस यांच्या मध्यस्थीने पूर्णत्वास जाणार आहे. जागेबाबत सीएडी कॅम्प व महाराष्ट्र शासन यांच्यात वाद निर्माण झाला होता. खासदारांनी ब्रिगेडीयर संजय शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेतली व स्मशानभूमी बांधकामाबाबत आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील व ब्रिगेडीयर संजय शेट्टी यांच्या समवेत समन्वय बैठक घेतली.

Web Title: Pulgaon Panchdhara cremation ground