शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावचे शासकीय रुग्णालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

हायरिस्कमध्ये असलेल्या १७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना काहींना वर्र्धा तर काहींना पुलगावात क्वारंटाईन केले. या घटनेमुळे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. रुग्णांची फरपट न होण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारळवार यांनी नगर परिषदेच्या शाळेमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : येथील शासकीय रुग्णालयातील फार्मासिस्ट कोरोना बाधित आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून वर्ध्यावरून ये-जा करणाऱ्या फार्मासिस्टव तिच्याबरोबर आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.हायरिस्कमध्ये असलेल्या १७ व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना काहींना वर्र्धा तर काहींना पुलगावात क्वारंटाईन केले. या घटनेमुळे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग व आंतररुग्ण विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. रुग्णांची फरपट न होण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारळवार यांनी नगर परिषदेच्या शाळेमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. येथील आठवडी बाजारात ठोक भाजी विक्रेत्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो राहत असलेला गांधीनगर परिसर सील करण्यात आला आहे तर त्याच दुकानात काम करणारा युवक पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला असून ५१ घरांतील १५० नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. भाजीविक्रेता आर्वीतील असल्याने पुलगाव मार्केटकडे वळले. त्यामुळे हे संपर्कात आले. परंतु, या सर्व प्रक्रियेत नागरिक मात्र दहशतीत आले आहे.१७ अहवाल निगेटिव्हग्रामीण रुग्णालयाच्या फार्मासिस्टच्या संपर्कात आलेल्या सतरा नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. व ते स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. नारळवार यांनी दिली. आठ दिवसांनंतर त्या सर्वांचे पुन्हा स्वॅब घेण्यात येणार असल्याचेही वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.शेअरिंग वाहन पडले महागातवर्ध्यावरून आरोग्य विभागातील कर्मचारी व शहरातील मेडीकल दुकानाचे मालक हे एकाच वाहनातून ये-जा करायचे. याच वाहनातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेली फार्मासिस्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोबतचे सर्व हायरिस्कमध्ये आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या मेडिकल दुकानाच्या संचालिकेलाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाºयांसह औषधी दुकानाच्या संचालिकेलाही १४ दिवस विलगीकरणात राहण्याचा फटका बसला.मुख्यालयी राहण्याचे आदेश धाब्यावरपुलगावात नोकरीवर असलेले कर्मचारी दररोज ये-जा करतात. जिल्ह्याच्या ठिकाणावरून शिक्षण, आरोग्य, बँक, कृषी, पंचायत आदी विविध विभागात ते जाणे येणे करतात. कोरोनाच्या काळात मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शासनाने त्यांना अटकाव करावा, जेणेकरुन विषाणूचा प्रसार होणार नाही. आज विविध उपाययोजना कोविड नियंत्रणासाठी शासनाद्वारे करण्यात येत आहे. पुलगाव या शहराला तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. त्यामुळे येथून इतर जिल्ह्यात आवागमन करणाºयांची संख्या जास्त आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या